ब्रम्हपुरी:- चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघ यांच्या वतीने दिल्या जाणारा ग्रामीण वार्ता पुरस्कार ब्रम्हपुरी येथील दैनिक महासागर चे तालुका प्रतिनिधि प्रशांत डांगे यांना काल झालेल्या कार्यक्रमात भा. ज.पा.नेते, माजी केबिनेट मंत्री , माननीय आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या हस्ते तर उद्घाटक माजी खासदार मान.नरेश पुगलिया
मुख्य मार्गदर्शक ,राहुल पांडे राज्य माहिती आयुक्त ,नागपूर यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार वितरण करण्यात आले. पत्रकार प्रशांत डांगे यांना पुरस्कार मिळाल्या बद्दल त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन केले जात आहे.ब्रम्हपुरी तालुका पत्रकार संघाचे वतीने आयोजित बैठकीत सन्मान करण्यात आला .सर्व पत्रकार बांधवांनी शुभेच्छा दिल्या,