तेलंगणातून आलापल्लीकडे सुगंधित तंबाखू घेऊन जाणारी कार येथील पोलिसांनी सापळा रचून पकडली. ही कारवाई करण्यात आली. यावेळी दहा लाख ३६ हजारांचा मुद्देमाल जप्त करून चालकास ताब्यात घेतले. रुणाल राजू झोरे (२८, रा. सावरकर चौक, आलापल्ली) असे आरोपीचे नाव आहे. तो कारमधून (एमएच ०४ जीयू- ५७१४) सुगंधित तंबाखू घेऊन येत असल्याची माहिती मिळाल्यावरून अहेरी ठाण्याच्या पोलिसांनी सापळा लावला. तीन लाख ३६ हजारांचा तंबाखू व सात लाखांची कार जप्त केली. हवालदार संजय बोलूवार यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद झाला. तपास सहायक निरीक्षक विजय चव्हाण करत आहेत.