कारंजा : (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे) वाशिम जिल्ह्यात काल दि १८ जुलै पासून,सततधार पाऊस कोसळत असून,प्रादेशिक हवामान केन्द्र,भारतीय हवामान विभाग नागपूर,यांनी हवामानाचा अंदाज व्यक्त करीत,येत्या सात दिवस म्हणजे संपूर्ण आठवडाभर पावसाचे अनुमान व्यक्त करीत प्रत्येक विभागाला सावधगीरी बाळगण्याचा इशारा दिला आहे. या अनुषंगाने संपूर्ण जिल्ह्यात यलो अलर्ट घोषीत करण्यात आला असून,या संदर्भात कारंजा मानोरा महसूल विभागाचे उपविभागीय अधिकारी लालितकुमार वऱ्हाडे यांनी, दि. 19 जुलै रोजी,एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे आपल्या अखत्यारीत येणाऱ्या विभागातील नागरिकांनी,शेतकरी,चाकरमान्यांनी,पावसाचा अंदाज घेऊन, सतर्कता बाळगूनच आपली दैनंदिन कामे उरकण्याचे आवाहन केले असून,नदी नाल्याला पूर असतांना रस्त्यावरील पुल ओलांडून जावू नये.तसेच नदी नाल्याला आलेला पूर पाहण्याकरीता जावू नये असे म्हटले असल्याचे महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी कळवीले आहे.