कारंजा : आपल्या आजोब्बा स्व . सेठ मनसुखलाल लाठीया आणि वडिल माजी नगराध्यक्ष कारंजा जोसिजचे संस्थापक अध्यक्ष अरविंदजी लाठीया यांच्या सामाजिक कार्याचा वसा घेऊन, सामाजिक चळवळीत स्वेच्छेने पुढे आलेल्या रोमिल अरविंदजी लाठीया यांनी दारूबंदी व व्यसनमुक्ती कार्याची स्वयंप्रेरणेने सुरुवात केल्याचा मला सार्थ स्वाभिमान असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त संजय कडोळे यांनी रोमिल लाठीया यांना शुभेच्छा देतांना व्यक्त केले आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, निसर्गोपचार दिनाचे औचित्य साधून रोमिल लाठीया यांच्या वाढदिवसी घेण्यात आलेल्या, श्री जगदंबा संस्थान, इन्नानी जीन कारंजा येथे व्यसनमुक्ती जनजागृती कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी अखिल भारतिय मराठी नाट्य परिषद मुंबई नियामक मंडळाचे लोकनियुक्त सदस्य नंदकिशोर कव्हळकर हे होते .
यावेळी शाल श्रीफळ गुच्छ देवून डॉ . इम्तियाज लुलानिया, डॉ. ज्ञानेश्वर गरड ,डॉ कलिम मिर्झा, डॉ . सावजी, डॉ राऊळ यांचे हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला . रोमिल लाठीया यांनी सर्वांना व्यसनमुक्ती आणि निसर्गोपचाराची शपथ दिली . कार्यक्रमाला बहुसंख्येने राहुल सावंत, सुनिल डाखोरे, सुनिल काटकर, सुनिल गुंठेवार, उमेश अनासाने, विजय खंडार, प्रदिप वानखडे, दामोधर जोधळेकर, आयकर सल्लागार ऍड संदेश जिंतुरकर, हाफिज खान इत्यादिंची उपस्थिती होती कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन डॉ इम्तियाज लुलानिया यांनी केले होते .