आरमोरी- भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आरमोरी येथील तथागत बुद्ध विहारात विविध कार्यक्रम घेऊन साजरी करण्यात आली.
कार्यकमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक मंडळाचे अध्यक्ष यशवंत जांभुळकर हे होते, कार्यक्रमाचे उदघाटन वेणूताई ढवगये यानी केले तर,प्रमुख अतिथी म्हणून किशोर सहारे, प्रज्ञा निमगडे , अंजली रोडगे, भावना बारसागडे कल्पना ठवरे, आदी उपस्थित होते
कार्यक्रमाच्या सुरवातीला महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन व उपासीका मीना सहारे व भावना बारसागडे यांनी "इतनी शक्ती हमे देना दाता"हे स्फूर्ती गीत गाऊन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना आदरांजली वाहिली.
यावेळी यशवंत जांभुळकर म्हणाले की,सावित्रीबाई फुले नसते तर खरोखर आज स्त्रि मुक्ती ची सोनेरी पहाट उगवली नसती. हजारो वर्षांपासून स्त्रियांना त्यांचे शिक्षणाचे हक्क, अधिकार , स्वातंत्र्य नाकारले. स्त्रिला फक्त दुय्यम वागणूक देवून इथल्या व्यवस्थेने स्त्रिला निच मानले.परंतु सावित्रीबाई फुले यांनी लढा देऊन स्त्रिला बंधनातून मुक्त केले
यावेळी वेणूताई ढवगाये, किशोर सहारे, सुनिता तागवान, यांनी आपले मनोगत व्यक्त केले
या वेळी गया जनबंधू व सुनिता तागवान, कुमता मेश्राम यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर एक पात्री नाटक सादर केले. भारतीय बौद्ध महासभा महिला आघाडी आरमोरीच्या वतीने सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा साकारून नृत्य सादर करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अंजलीताई रोडगे यानी केले.तर संचालन भारतीय बौद्ध महासभेच्या सरचिटणीस भारती मेश्राम यांनी केले.तर आभारप्रदर्शन प्रज्ञा निमगडे यांनी केले.
या कार्यक्रमाला भारती मेश्राम,मिना सहारे, विद्या चौधरी,लता बारसागडे, गया घरडे, कल्पना ठवरे, कल्पना वासनिक, सुलभा बोरकर, कुंदा झाडे, अनुराधा रामटेके,कल्पना वासनिक, वर्षा मेश्राम,किरण रामटेके, उज्वला वासनिक, मंदा तुमडे, कुंदाताई मेश्राम, सुनिता तागवान, अर्चना शेंडे,राधा हुमणे, दुर्गा मेश्राम, ,किरण बांबोडे, छाया मेश्राम, , वर्षा खोब्रागडे, गया जनबंधू, तनुजा इंदुरकर व इतर बहुसंख्य महिला या कार्यक्रमाला उपस्थित होते..
आपल्या प्रतिक्रिया द्या....