वाशिम: आपल्या भारत देशातील बारा कोटी बंजारा समाजाचे एकमेव पवित्र धर्मपिठ तिर्थक्षेत्र पोहरादेवीच्या विकासाकरीता आणि वाशिम जिल्ह्याच्या रखडलेल्या विकासाकरीता सक्षम असे एकमेव नेतृत्व म्हणजेच, भटक्या विमुक्त बंजारा समाजाचे देशपातळीवरील एकमेव लोकप्रिय नेते ना. संजयभाऊ राठोड हेच आहेत. ना. संजयभाऊ राठोड यांना तिर्थक्षेत्र आराखड्याचा योग्य अभ्यास असल्यामुळे आणि जिल्ह्याच्या रखडलेल्या विकासाची इत्यंभूत माहिती असल्यामुळे केवळ तेच जिल्ह्याला पालकमंत्री म्हणून न्याय मिळवून देवू शकतात. आणि म्हणूनच ना. संजयभाऊ राठोड यांनाच वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री करण्यात यावे अशी जिल्ह्यातील नागरिकांची मागणी आहे . तसेच वाशिम जिल्ह्यातील भटक्या विमुक्त समाजाचे समाजसेवक महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त - संजय कडोळे यांनी सुद्धा ना संजयभाऊ राठोड यांनाच लवकरात लवकर वाशिम जिल्हा पालकमंत्री म्हणून घोषीत करण्याची मागणी, मुख्यमंत्री ना एकनाथजी शिंदे यांचेकडे निवेदनाद्वारे लावून धरली आहे.