कारंजा : स्थानिक पांजरपोळ गोरक्षण संस्था आणि गो ग्रीन फाउंडेशन कारंजा यांच्या संयुक्त विद्यमाने आज सकाळी आठ वाजता कारंजा पांजरपोळ गो शाळा छत्रपती शिवाजी महाराज जयंती आणि कारंजा कर्मभूमितील विकास पुरुष,योजना व सहकार महर्षी,माजी मंत्री स्व.बाबासाहेब धाबेकर यांचे जयंती निमित्त, सोमवार दि.19 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 08:00 वाजता स्थानिक पांजरापोळ गोरक्षण संस्थेच्या प्रांगणात सुनीलभाऊ धाबेकर यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी सर्वप्रथम संस्थेचे सचिव आशिष भाऊ तांबोळकर यांनी गोरक्षण संस्थेच्या सामाजिक दायित्वाची तपशिलवार माहिती दिली.
सुनीलभाऊ Achcha यांनी अध्यक्षीय संभाषणातून "मानवी जीवना करीता कामधेनू ठरणाऱ्या गायीचे महत्व सांगून संस्थेने गोमुत्र मधून गोमुत्र अर्क व इत्यादी स्वदेशी औषधी व इतर वस्तूचे निर्माण करावे असे सांगितले तसेच झाडे वेली वृक्ष मानवी जीवनाकरीता अन्न,औषध,प्राणवायू व सुख समाधान देणारी असल्यामुळे वृक्षारोपणा सोबतच वृक्ष संवर्धनाला महत्व द्यावे असे विचार आपल्या मनोगतातून व्यक्त केले.सदर कार्यक्रमास जेष्ठ पत्रकार सुधाकरभाऊ गर्जे, गोरक्षणचे अध्यक्ष ब्रिजमोहनजी मालपाणी,गो ग्रीन चे आशीषजी बंड,डॉ. नवल हेडा,डॉ. नवल सारडा, डॉ. साबु, विजुभाऊ बगडे, घुडे दादा,पत्रकार संजयजी कडोळे,रघुभाऊ वानखडे तसेच गो ग्रीन फाउंडेशन व गोरक्षण संस्थेचे सर्व सदस्य गण उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन गोपाल कडू सर यांनी केले. कार्यक्रमाला तिन्ही संस्थेचे पदाधिकारी व सदस्य तसेच गणमान्य व्यक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होते.