वाशिम: भारतिय सैन्यदलाच्या भूदल,नौदल,वायुदल या तिनही दलातील जवान हे आमच्यापैकीच आहेत.निश्चितच यापैकी कुणीतरी आपल्या गावातील,जिल्ह्यातील, प्रांतातील किंवा राज्यातील आहेत. त्यापैकी काही आपल्या नात्यातील तर काही आपल्या गावकरी मंडळींच्या नात्यातील असू शकतात.यापैकी अनेकजण अविवाहित असतील तर बरेच जणांचे विवाह नुकतेच झालेले असतील.भारतिय सैनिकांमध्ये काही आपल्या लेकीबाळी किंवा लाडक्या बहिणीही असतील.या सर्वांनी अक्षरशः स्वतःच्या घरादारावर आणि परिवारावर तुळशीपत्र ठेवून,मातृभूमिच्या आणि तुमच्या आमच्या संरक्षणाची शपथ घेऊन,स्वतःला भारतिय सैन्यदलात भरती करून घेतलेलं आहे.प्रखर उष्णता असो धो धो पाऊस असो किंवा कडाक्याच्या थंडी असो,वेळप्रसंगी अक्षरशः उपाशी तापाशी राहून सुद्धा स्वतःच्या प्राणाची बाजी लावून म्हणजेच तळहातावर प्राण घेऊन हे पुरुष जवान किंवा महिला सैनिक सिमेवर खडा पहारा देत शत्रूराष्ट्राचे हल्ले परतवून लावीत त्यांच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देत असतात.सिमेवर आपले जवान सतर्क असल्यामुळेच आपण निवांतपणे जीवन जगत असतो. त्यामुळे त्यांचे आपल्यावरील उपकाराची जाणीव आपल्या सर्वांना असायला हवी आहे. आणि म्हणूनच,आपल्या ह्या जवानांच्या सुरक्षेसाठी प्रार्थना करणे हे आपले कर्तव्य ठरते. त्यामुळे आपण सर्वांनी परमेश्वराकडे ह्यांच्या सुरक्षेची, तन्दुरुस्तीची,आरोग्याची प्रार्थना करायला हवी आहे.म्हणून प्रत्येकाने आपले आराध्य दैवत प्रभू श्रीरामाच्या "श्रीराम जयराम जय जय राम !" या रामनामाची दररोज एक माळ जपून श्रीराम नामाची मनोमन शृंखला तयार करावी.व भारतिय जवानांचे आणि जवानांच्या कुटूंबियांचे मनोधैर्य वाढवावे.असे आवाहन जय भवानी जय मल्हार वारकरी मंडळाचे दिंडीप्रमुख तथा विदर्भ लोककलावंत संघटना कारंजाचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी नागरीकांना केले आहे.