चक्रवती राजा सम्राट अशोकने निर्माण केलेले महाबोधी महाविहार हे युनेस्को नुसार बौद्धांचे जागतिक धरोहर असून सुद्धा ते बौद्ध ऐवजी हिंदूंच्या ताब्यात आहे. बुद्धगया येथील महाबोधी महाविहार गैरबौद्ध हिंदूपासून मुक्त करावे व या विहाराचे प्रबंधन बौद्धांकडे सोपविण्यात यावे, तसेच १९४९ चा बुध्दगया मंदीर कायदा रद्द करावा या मागणीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक मंडळ आरमोरीच्या वतीने अध्यक्ष मदन मेश्राम यांचे नेतृत्वात एका शिष्टमंडळाने तहसीलदार आरमोरी मार्फत महामहीम राष्ट्रपती तसेच बिहारचे राज्यपाल व मुख्यमंत्री यांना निवेदन दिले.. मंदीर, मस्जिद, गुरुद्वारा , चर्च इत्यादींचे प्रबंधन अनुक्रमे हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन यांचेकडे असते. बौध्द गया महाविहारावरचा हिंदूंचा ताबा हा संविधानाच्या कलम १३, १४, १५, २५, २६ चे पूर्णतः उल्लंघन आहे . या ठिकाणी गौतम बुद्धांना ज्ञान प्राप्त झाल्याने चक्रवती राजा सम्राट अशोकाने निर्माण केलेले हे महाविहार जागतिक बौद्धांच्या आस्थेचा आणि अस्मितेचा विषय आहे , म्हणून आता कोणत्याही परिस्थितीत हे महाविहार मुक्त झालेच पाहिजे अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.. देशातील बुद्ध-फुले, आंबेडकरी विविध पक्ष-संघटना एकवटल्याने महाबोधी महाविहाराच्या अनुषंगाने भविष्यात फार मोठे आंदोलन उभे राहील असा आग्रह डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक मंडळाचे अध्यक्ष मदन मेश्राम, उपाध्यक्ष अमरदीप मेश्राम, सचिव जयकुमार शेंडे, कोषाध्यक्ष कल्पनाताई ठवरे,सदस्य कलीराम गायकवाड,सामाजिक कार्यकर्ते विजयकुमार ठवरे, हरिदास सहारे, सिद्धार्थ साखरे तसेच प्रियदर्शी सम्राट अशोक सोशल फोरमचे खिरेंद्र बांबोळे, डॉ.प्रदीप खोब्रागडे, दीपक गणवीर, प्रविण रहाटे इत्यादी सामाजिक संघटनेच्या उपस्थित कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केला..