ब्रम्हपुरी:-
राष्ट्रीय कराटे असोसिएशन, मार्फत शिमला (हिमाचल प्रदेश) ह्या ठिकाणी 9 ते 10 ऑक्टोबर 2022 रोजी, दोन दिवशीय राष्ट्रीय कराटे स्पर्धा घेण्यात
आली.
आपल्या देशातील जवळपास 10 ते 12 राज्यांनी ह्या स्पर्धेत भाग घेतला होता. यामध्ये, महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करत ब्रम्हपुरी कराटे असोसिएशनचे मुख्य प्रशिक्षक, शिहान- गणेश लांजेवार (इंडिया चीफ एक्सामीनर) यांचा मार्गदर्शनात 25 विध्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. यात 5 सुवर्णपदक, 4 रजत पदक, तर 3 कांस्य पदक प्राप्त केले. प्रथम आणि द्वितीय क्रमांक प्राप्त करणाऱ्या विध्यार्थ्यांना (silver trophy) देण्यात आली. यामध्ये, अविनाश धारा, राशी बोरकर, अथर्व रामगुंडे, विभाश्री भेंडारे, क्रिष्णा समरीत यांना सुवर्ण पदक प्राप्त झाले. तर, हिमांशू सुतार, संस्कृती शेंडे, यश जीवतोडे, तनुजा इचकापे यांना कांस्य पदक प्राप्त झाले. तसेच, काता या विशेष गटात राशी बोरकर, तनुजा इचकापे, अथर्व रामगुंडे यांना कांस्य पदक प्राप्त झाले.
सदर शिमला येथे झालेली राष्ट्रीय परीक्षा श्री.विनोद गुप्ता सर आणि श्री.श्याम भोवते सर यांचा मुख्य मार्गदर्शनात पार पडली.
या सर्व विजेत्या खेडाळुंचे, चंद्रपूर जिल्हा आष्टेडू मर्दानी आखाड्याचे अध्यक्ष श्री.गणेश तर्वेकर, सचिव श्री.गणेश लांजेवार, उदयकुमार पगाडे, सचिन भानारकर ह्या सर्वांनी अभिनंदन करित, स्वागत केले...
आपल्या प्रतिक्रिया द्या....