काही नेत्यांकडून जाती-जातीत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न असे प्रयत्न हाणून पाडा.
वाशिम :
मराठा समाजाला आरक्षण मिळण्याचे प्रकिया सुरु असुन लवकरच या सुवर्ण क्षणाचे आपण साक्षीदार असणार आहोत.काही नेत्यांकडून जाती-जातीत तेढ निर्माण करण्याचे षडयंत्र आखले जात असून कुणालाही बळी न पडता अपमान पचवत हे आंदोलन आपल्याला पुढे सुरु ठेवायाचे आहे. तरी मराठा समाजाने शांतता राखावी असे आवाहन मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी काटा येथे आयोजित जाहीर सभेत केले आहे.
मनोज जरांगे पाटील यांचा समाजातील बांधवांना भेटी गाठी दौरा सुरु असून विदर्भात त्यांच्या दौºयाच्या ४ टप्प्याची सुरुवात दोन दिवसापासून सुरुवात झाली असून जळगाव जामोद, खामगाव, पातूर तालुक्यातील चरणगाव आणि आज दि. ५ डिसेंबर रोजी काटा या गावात त्यांची सभा पार पडली. या सभेला संबोधित करतांना ओबीसीचे नेते म्हणवून घेणारे सरकारमधील मंत्री असलेल्या छगन भुजबळ यांच्यावर टिकास्त्र सोडले. ओबीसी समाजाला उसकवून आपली राजकीय पोळी शेकणे सुरु केले आहे. काल फुलउंबरी येथे काही समाजकंटकाकडून मराठ्यांचे बॅनर फाडून जाळण्याचे त्या ठिकाणी तणाव निर्माण झाला होता. त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाने माझ्याशी संपर्क करून शांतता पाळण्यासाठी माझा फोन स्पीकरवर टाकून जमावाला शांतेतचे आवाहन करण्याची विनंती केली. मी त्या ठिकाणी थोडंही वेगळे बोललो असतो तर उपस्थित जमाव काहीही करू शकला असता. मात्र, हे आंदोलन आपल्याला शांतेत करायचे असल्याने मी सर्वांना शांतता राखण्याचे आवाहन केले. उपस्थित २५ ते ३० हजार जमलेला माझा मराठा बांधव माझ्या एका शब्दावर शांततेने आप-आपल्या घरी गेला हे आमचे संस्कार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.
पुढे बोलताना मराठा बांधवासोबत ओबीसी बांधवांनाही यावेळी त्यांनी आवाहन केले की, आपण गाव खेड्यात राहणारे ओबीसी आणि मराठा बांधव गुण्या-गोविंदाने नांदत असतो. एकमेकाच्या सुख-दु:खात धावून जातो. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळाल्यास तुमचे काही नुकसान होणार नाही. मराठा समाज हा आरक्षणातच आहे. मात्र, सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे त्याचा लाभ आजपर्यंत मिळाला नाही. आम्ही आमच्या हक्काचे मागतोय, या आंदोलनामुळे राज्यात ३५ लाख कुणबीच्या नोंदी मिळाल्या आहेत. हे सरकारचे पाप आहे.
छगन भुजबळ नामक ओबीसीचे नेते म्हणवून घेणारे हे आपल्या काही ओबीसी बांधवांची दिशाभूल करीत आहेत. याकडे ओबीसी बांधवांनी लक्ष देण्याची गरज नाही. राज्यात तेढ निर्माण झाल्यानंतर गोरगरीब ओबीसीचे बांधवच भरडल्या जातील. छगन भुजबळ बंगल्यात जावून बसेल. लाठी, काठी, कोयता, कुºहाडाची भाषा करणाºया छगन भुजबळ सरकारने आवारावे अन्यथा आम्ही काही हातात बांगड्या भरलेल्या नाहीत. आरक्षण मिळपर्यंत आम्ही शांत आहोत. शेवटी ते कुठेच जाणार नाही आणि आम्ही कुठेच जाणार नाही. आमच्या घरातही काय-काय आहे. हे आम्ही त्यांना त्यावेळी दाखवू अशा कडक शब्दात छगन भुजबळ यांचा समाचार घेत मराठा बांधवांनी आंदोलन कुठे भरकटू न देता शांततेचे आवाहन केले. राष्ट्र गीताने सभेची सांगता झाली.
काटा गावांमध्ये मनोज जरांगे पाटील यांचे फुलांचा वर्षाव करून स्वागत करण्यात आले. विचारपीठावर गावातील तसेच स्वामी विवेकानंद विद्यालय कोकलगाव येथील चिमुकल्यांनी औक्षण केले. साखळी उपोषण कार्यकर्त्यांनी पुष्पहार घालून जरांगे पाटील यांचे स्वागत केले. जरांगे पाटील यांनी महापुरुषांना अभिवादन करून सभेला संबोधित केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक किशोर जाधव , सुत्रसंचालन गजानन वाघ, नारायण काळबांडे, देवळे तर आभार विरेंद्र देशमुख यांनी मानले.