चंद्रपुर-घुग्गुस मार्गावरील वर्धा नदीच्या बेलोरा पुलालगत चारचाकी वाहनाचा शुक्रवारी अपघात झाला असून पतिपत्नी जखमी झाल्याची घटना घडली आहे. दरम्यान जखमींवर उपचार सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार वाहन चालक प्रफुल बर्डे हे वेकोली मध्ये सुरक्षा रक्षक असून आपल्या पत्नीसह चारचाकी वाहनाने जात होते मात्र चंद्रपुर घुग्गुस मार्गावरील वर्धा नदीच्या पुलावरून जात असताना बेलोरा येथील पुलाजवळ चारचाकी वाहन पलटी झाले.
या अपघातात पतिपत्नी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. या घटनेची माहिती घुग्गुस पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पुढील तपास घुग्गुस पोलीस करत आहेत.