वाशिम : केन्द्रशासनाने कठोरात कठोर कायदे करूनही महिलांवरील व विशेषतः शालेय शिक्षण घेणाऱ्या चिमुकल्या वरील किंवा दिव्यांग मतिमंद मुलींवरील अन्याय अत्याचार जेव्हा वाढतांनाच दिसतात.तेव्हा मनामध्ये अशा विकृत क्रृरकर्मा राक्षसी प्रवृत्ती विषयी मनामध्ये संतापाची भावना निर्माण होते. बदलापूर येथील चिमुकल्या मुलींवरील अन्यायाचा आम्ही निश्चितच निषेध नोंदवीतो.आणि निषेध नोंदवीत असतांना केन्द्रशासनाला विनम्र प्रार्थना करतो की,शासनाने अशा विकृत बलात्काऱ्या विषयी कोणतीही दयामाया न दाखवीता त्यांच्या वरील खटले अतिशिघ्र न्यायालयातच चालवून त्यांना लवकरात लवकर दगडाने ठेचून ठार मारण्याच्या शिक्षेची तरतूद करावी.अशा शब्दात बदलापूर येथील काळीमा फासणाऱ्या घटनेबद्दल आपली प्रतिक्रिया दिव्यांग जनसेवक संजय कडोळे यांनी व्यक्त केली आहे.