पाचोड़ येथूनआर्वी कडे जाणारी Bolero Accident बोलेरो गाडी वाढोना घाटात पलटी झाल्याने 18 जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज शनिवार ९ रोजी घडली. चार गंभीर जखमीवर आर्वी उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर चौघांना सेवाग्राम येथे हलविण्यात आले आहे तर 11 जखमीना वर्धा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आर्वी तालुक्यातील पाचोड येथील भागचंद पवार यांचे मुलीचे विवाह सोहळ्यास आर्वीत जात असताना वाढोना घाटात हा अपघात घडला. बोलोरो पिकप एम एच 40/ 4148 या क्रमांकाची ही गाडी असून ही गाडी पाचोड येथील किशोर यांचे मालकी ची आहे.
लग्नसमारंभा करीता वरात टेम्पोने आर्वीकडे येत असतांना अचानक Bolero Accident टेम्पो पलटी झाल्याने भयंकर अपघात झाला. त्यावेळी येणाऱ्या जाणाऱ्यांनी तात्काळ मदत करत अपघातग्रस्तांना उपजिल्हा शासकीय रुग्णालयात भरती केले. याची माहिती आमदार दादाराव केचे यांना कळता त्यांनी थेट उपजिल्हा रुग्णालय गाठले. रुग्णांची एकंदरीत वैद्यकीय स्थितीबाबत डॉक्टरांकडून जाणून घेत परिस्थितीचा आढावा घेऊन अपघातग्रस्तांना तातडीने वर्धा येथे उपचारासाठी पाठविण्या करीता आ. दादाराव केचे यांनी तातडीने रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या. पोलिस पुढील तपास करीत आहे.