स्थानिक आरमोरी प्रसिद्ध डॉ.प्रदीप खोब्रागडे यांना आयुष्य इंटरनॅशनल मेडिकल अशोसिएशन तर्फे विदर्भ गौरव पुरस्कार 2022 प्रदान करण्यात आला.त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेत त्यांना आयुष्य इंटरनॅशनल मेडिकल असोसएशनच्या वतीने विदर्भ गौरव पुरस्कार देण्यात आला.कोरोना काळात शासनाला उत्कृष्ठ सहकार्य सोबतच सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.डॉ.प्रदीप खोब्रागडे हे अतिशय शांतप्रिय व समंजस आणि गोरगरीब रुग्णाची आत्मीयतेने विचारपूस आणि योग्य उपचार करून सामाजिक बांधिलकी जोपासतात .सोबतच सम्राट अशोक फोरम या नावाखाली समाजउपयोगी विविध सामाजिक उपक्रम घडऊन आणतात आणि सामाजिक बांधिलकी जोपासतात.
शेगाव येथील पार पडलेल्या कार्यक्रमात त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. अन्न आणि औषध प्रशाशन मंत्री.डॉ.राजेंद्र शिंगणे आणि डॉ.रणजित पाटील आमदार संजय कुटे आमदार प्रकाश फुंडकर आणि खासदार उल्लास पाटील जोशी ,विकास दहिया, सतीशचंद्र भट्ट, डॉ.सतीश कराडे,डॉ.नितीन राजे पाटील,यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ.प्रदीप खोब्रागडे यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.