चंद्रपूर : एनावरे चारण्यासाठी जंगलात गेलेल्या शेतकर्यावर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना काल शुक्रवारी (10 जून) रोजी दुपारी 1 वाजताच्या सुमारास मुल तालुक्यातील पडझरी येथील वनविभागाच्या बफर झोन क्षेत्रात घडली. प्रमोद झुंगाजी मोहुर्ले (वय 42) असे मृताचे नाव असून तो पडझरी निवासी होता.
प्रमोद मोहुर्ले हा शेतकरी नेहमीप्रमाणे भादुर्णीजवळ असलेल्या पडझरी येथील वनविभागाच्या बफर झोन क्षेत्रात स्वत:च्या मालकीची जनावरे चिरण्यासाठी घेऊन गेला होता. जंगलात दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. त्याचा जागीच मृत्यू झाला. सदर गटनेची माहिती वनविभागाला मिळाल्यानंतर वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह विच्छेदनासाठी पाठविण्यात आला.
या परिसरात वाघाचे हल्ले सातत्याने होत आहे.
आतापर्यंत डझनभर नागरिकांचा बळी वाघिच्या हल्यात झाला आहे. वारंवार वाघांचा बंदोबस्त करण्याची मागणी हैत असतानाही उपाययोजना करण्यास वनविभाग अपयशी ठरत आहे. काही दिवसांपूर्वी माजी मंत्री तथा भाजपच्या नेत्या शोभाताई फडणवीस यांनी वाघांचा बंदोबस्त करा अन्यथा कायदा हातात घेवून आम्हिच बंदोबस्त करू असा निर्वाणीचा इशारा दिला होता. शिवाय चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांची शूतक-रांसमवेत भेट घेवून मागणी केली होती. उपाययोजना करण्याचे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले होते. मात्र त्यानंतरही वाघाचे हल्ले थांबलेले नाही. शेतकरी, शेतमजूरांचे जीव जातच आहेत.