कारंजा (लाड .) : सामान्य जनमाणसात लोकप्रिय म्हणून ओळखले जाणारे,हवामानाचा अचूक अंदाज देणारे,कारंजा विधानसभा मतदार संघातील ग्राम रुईगोस्ता येथील हवामान तज्ञ गोपाल विश्वनाथ गावंडे,यांच्या अंदाजाने सावध होऊन ग्रामस्थ व शेतकरी आपली शेतातील कामे उरकून सावध होत असतात.आणि सतर्कतेच्या दृष्टिने,अंदाजाची ग्रामस्थांना प्रतिक्षा असते.
मागील महिन्यापासून,गोपाल गावंडे यांचे अंदाज जवळपास खरे ठरले असल्याचा प्रत्यय लोकांना आलेला आहे. नुकतेच त्यांनी महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेला हवामाना अंदाज दिला तो देणेप्रमाणे त्यांनी सांगीतले की आणखी आठवडाभरापर्यंत तरी, महाराष्ट्रात आकाशात आभ्राच्छादित हवामान राहणारच असून, येत्या चोवीस तासात यवतमाळ, चंद्रपूर ,गडचिरोली, गोंदिया जिल्हयात विजांच्या कडकटासह काही भागात ढगफुटी तर काही भागात कोसळघारा बरसणार असून, उर्वरीत भागात पाऊस भाग बदलवत,येणारच आहे. शिवाय पश्चिम विदर्भातही, रिम झिम ते चांगला पाऊस होईल.तर उर्वरीत भागात ढगाळलेले हवामान मात्र कायम राहील.तर मराठवाड्यात पाऊस जास्त होणार नाही .