दि.14/10/2022ला जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, मुरसा येथे ढोरवासा केंद्राची तृतीय शिक्षण परिषद मोठ्या उत्साहात व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.कार्यक्रमाचे अध्यक्ष- मान.श्री गायकवाड सर (केंद्रप्रमुख, केंद्र ढोरवासा)
प्रमुख पाहुणे मान. श्री रवींद्रभाऊ उगे (अध्यक्ष शा. व्य.स.), मान. श्री सूनीलभाऊ मोरे (उपसरपंच मूरसा), मान. सौ. बेबीताई नांदे (उपाध्यक्ष शा. व्य. स.), श्री रुपेशभाऊ नवले (सदस्य शा. व्य. स.), सत्कारमूर्ती मान. संगीता कळसकर मॅडम (सेवानिवृत्त शिक्षिका, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, गवराळा)
सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
त्यानंतर अतिथी देवो भव या आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे पुष्गुच्छ देऊन सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
शिक्षण परिषद घेण्याचा उद्देश व रूपरेषा मान. गायकवाड सर यांनी प्रास्ताविकातून पूर्ण केली.
कार्यक्रमाच्या सत्कारमूर्ती मान. कळसकर मॅडम यांनी सेवाकाळतील अनुभव कथन केले.
कार्यक्रमाचे पहिल्या पर्वचे संचालन समिता घाटे मॅडम व आभारप्रदर्शन ज्योती पारखी मॅडम यांनी केले.
सत्र दुसरे
श्री गायकवाड सर केंद्रप्रमुख यांनी ओ उपरवाले देखणा हमको एकबार.... या सूमधुर गितगायनाने सर्वांना मंत्रमुग्ध करत आपल्या तासिकेला सुरुवात केली. शिक्षक पर्व उपक्रम अंतर्गत नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती व प्रश्न पेढी निर्मिती याविषयी विस्तृत माहिती दिली. तसेच इ.१ते ५व ६ते ८या वर्गातील साध्य करायच्या अध्ययन निष्पत्ती यावर चर्चा घडवून आणली.
सौ. मेघा शेंडे मॅडम यांनी अध्ययन निष्पत्ती नुसार हिंदी विषयाचे पाठ सादरीकरण करताना त्यांनी विविध प्रकारच्या सूचना कार्डचा वापर करून सर्व शिक्षकाकडून कृती करून घेतल्या. पाठ घेत असतानाच एकवचन बहुवचन,विलोम शब्द,समान अर्थ वाले शब्द अशा विविध प्रकारचा सराव घेतला. पाठावर आधारित प्रश्न काढून दाखविले. शेवटी डोळ्यावर पट्टी बांधून सूचना कार्डचे वाचन व कृती करणे हा खेळ घेऊन पाठ अधिक रंजक करण्यात आला.
विद्या कवाडे मॅडम विषयतज्ञ यांनी वर्ग ४थी विषय इंग्रजी यातील Sky is falling हा पाठ प्रत्यक्ष विद्यार्थी नाट्यीकरणाद्वारे घेऊन अध्ययन निष्पत्ती साध्य केल्या. व इंग्रजीची भिती दूर करत मुलांना बोलते केले.
श्री अजय गाडगे सर यांनी web link वरुन ragistration करण्यासाठी link दिली व प्रत्यक्ष शिक्षकांकडून लिंक भरून घेतली. त्यानंतर विज्ञान विषयातील "पान"या घटकावर पाठ सादरीकरण करताना प्रश्न निर्मिती केली व Template मध्ये सर्व शिक्षकाकडून प्रश्न भरण्याचे प्रात्यक्षिक करून घेतले.
श्री भास्कर गेडाम सर यांनी *पूर्णाक संख्याचा लहानमोठेपणा,बेरीज व वजाबाकी समजणे व करता येणे ही अध्ययन निष्पत्ती साध्य करण्यासाठी संख्या रेषेचा वापर करून धन ऋण संख्यांची बेरीज वजाबाकी सहज समजावून दिली.
कु. वंदना बोढे मॅडम यांनी संख्या व मुलाक्षर दृढीकरण करण्यासाठी परिसरात मनोरंजक खेळ घेऊन अध्ययन निष्पत्ती साध्य केली. व दिवसभरात मार्गदर्शन व सहकार्य केल्याबद्दल केंद्रप्रमुख तथा सर्व शिक्षकांचे आभार मानले.
शेवटी मुरसा शाळेतर्फे स्वादिष्ट जेवणाचा व लाडूचा आस्वाद घेत सर्वांनी कार्यक्रमाची सांगता केली.
आपल्या प्रतिक्रिया द्या....