महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवर लक्ष वेधण्यासाठी एकदा मतदान केले की मतदारांना पाच वर्षे गृहीत धरत असल्याने तसेच राजकारणाचा चिखल होतं असलेल्याने "एक सही संतापाची" ही मोहीम राबवण्याचा प्रारंभ आज दि. ९ जुलै ला स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज चौक ब्रह्मपुरी येथे करण्यात आला.
राज ठाकरे यांच्या आदेशानुसार तालुकाध्यक्ष सुरज भाऊ शेंडे यांच्या नेतृत्वाखाली तसेच पदाधिकारी यांनी संतापजनक सहीची मोहीम राबविण्यात आली त्याला सामान्य जनतेचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष संजय पारडवार तालुकाध्यक्ष सुरज भाऊ शेंडे, मंगेश फटींग, गंगाधर ढोरे, विलास आंबोने, विहार मेश्राम, जितु गणवीर, सुनील झाडे, दिपक मेहर, सुनील कुंभारे, हरिष हटवार, गुड्डू तन्नेवार , मनोज शंभरकर, वैभव नागदेवते, कैलास कांबडी, मुरली नखाते, पवन रुईकर, प्रफुल्ल लोखंडे, शिशुपाल बुराडे, तसेच असंख्य महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते