विकास सर्व स्पर्शी करण्याचा संकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात होत असून अकोले करांसाठी सिटी बसेसची व्यवस्था पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली असून अकोला महानगरपालिकेच्या विकासासाठी अकोलेकरांच्या वेगवेगळ्या सुविधेसाठी दोन हजार कोटी पेक्षा जास्त निधी उपलब्ध करून देण्याचा महानगरपालिकेच्या इतिहासामध्ये सर्वात निधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देऊन सर्वसामान्यांना सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे या प्रयत्नात तत्कालीन केंद्रीय मंत्री संजय भाऊ धोत्रे स्वर्गीय आमदार गोवर्धन शर्मा आमदार रणधीर सावरकर यांनी विशेष प्रयत्न करून सरकारकडून सातत्याने पाठपुरावा करून निधी आणला तसेच, खासदार अनुप धोत्रे आमदार वसंत खंडेलवाल यांचा वाटा असून या माध्यमातून शहराचा विकास करणे हे उद्दिष्ट ठेवून वाटचाल सुरू आहे या वाटचालीला गती देण्याचं काम करण्यासाठी पुन्हा भारतीय जनता पक्ष मित्र पक्षांचे सरकार आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी मतभेद विसरून समाज आणि राष्ट्र हितासाठी ईश्वराने दिलेली जबाबदारी पार पाडण्यासाठी कार्य करावे असे आव्हान माजी महापौर विजय अग्रवाल यांनी केले.
प्रभाग 20 मध्ये आयोजित कार्यकर्ते कार्यकर्ते बूथ प्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख, पन्ना प्रमुख तसेच विविध सामाजिक कार्यकर्त्यांशी संवाद साधताना ते बोलत होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जयंत मसने हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून आमदार रणधीर सावरकर, संजय गोटफोडे , रमेश अल्करी, एडवोकेट देवाशिष काकड एडवोकेट देवाशिष काकड आम्रपाली उपरवट , गोपाल मुळे गोपाल मुळे गणेश अंधारे व्यंकट ढोरे शारदा ढोरे विनोद मापारी सुमनताई गावंडे, विजय इंगळे, अभिजीत बांगर, एडवोकेट कुणाल शिंदे, गणेश सारसे विद्याधर काकड, आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
भाजपाचा कार्यकर्ता हा हनुमान
भाजपाचा कार्यकर्ता यांनी ठरवले तर तो काम यशस्वीरित्या करतो हे अनेकदा सिद्ध झाले आहे लोकसभा मध्ये नेत्र दीपक विजय प्राप्त करून दिले आगामी महानगरपालिका जिल्हा परिषद नगरपालिका या निवडणुकीमध्ये सुद्धा भारतीय जनता पक्ष मोठ्या संख्येत विजयी होणार आहे परंतु कार्यकर्त्यांनी निवडणुकी च्या पद्धतीने लढल्या पाहिजे निवडणुकीमध्ये सज्जकपणे मतदारांशी संपर्क करून मतदान केंद्रावर 51 टक्के मतदान आपल्या पक्षातला व्हावे या दृष्टीने कार्य करावे सामाजिक राष्ट्रहितासाठी नागरिक भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी आहे जनतेच्या समस्या व अशा आकांक्षा आपण पूर्ण केले आहे अजून समस्या पूर्ण करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार कटीबद्ध असून आपण या भागाचा परिसर विकास करण्यासाठी सज्ज असल्याचे आमदार रणधीर सावरकर यांनी सांगितले.