कारंजा तालुक्यातील काजळेश्वर तथा परीसरातील प-हाटीचे पीक जमीनीतून निघाल्या निघाल्या फस्त केल्याचे लक्षात येताच अनेक शेतकऱ्यांनी दुबार पेरणी साठी धावपळ चालू केली आहे .
वृत्त असे की सोयाबीनला बाजारभाव आधारभूत किंमती एकढा मिळत नसल्याने काजळेश्वर; पानगव्हान; उकर्डा; जानोरी ;पलाना;विराहीत;पारवा खांदला; उजळेश्वर शेतशिवारातील शेतक-यांनी कपाशी पीकाची लागवड मोठ्या प्रमाणात केली . पेरणीवर वरचेवर पाऊस आल्याने पीके अंकुरली त्यामुळे पेरणी यशस्वी झाल्याचा आनंद शेतकऱ्यांचे चेह-यावर दिसत होता मात्र वाणी नावाच्या प्रजातीने कोवळे पीक खाण्याचा सपाटा लावला . अनेक शेतकर्यांचे कपाशी पीक दोन दिवसात नेस्तनाभूत केले . शेतातील पीकाची पाहणी केली असता प्रत्येक कपाशी कोवळ्या रोपावर वाणी नावाच्या प्रजातीने पीके फस्त करण्याचा सपाटा लावला .शेकडो एकर कपाशी पीक असलेली शेती वाणीने कोवळी रोपे खाऊन नष्ट केले . त्यामुळे शेतकऱ्यावर हे नवे संकट उभे ठाकले .खाडे भरणे तथा एकरच्या एकर काळी केलेली जमीन दुबार पेरणीसाठी बीज व मजूर शोधन्याची धावपळ शेतक-र्यांची दिसत आहे . निसर्ग; वण्य प्राणी यांच्या तून सुटण्यासाठी कोणते पीक पेरावे हा प्रश्न शेतकऱ्या समोर आहे . तूर पीकाला डुकराचा त्रास आहे सोयाबीनला रोही हरणांचा माकडांचा त्रास आहे .वाणीचा बंदोबस्त कसा करावा ही विवंचना शेतक ऱ्यांसमोर आहे .कृषी विभागाने उदभवलेल्या संकटासाठी शेतकऱ्यांचे समुपदेशन करणे गरजेचे आहे तथा शासनाने आपदग्रस्त शेतकऱ्यांना आर्थीक मदत देणेही गरजेचे असल्याचे किसान ब्रिगेड शाखा अध्यक्ष नितीन पाटील उपाध्ये यांनी म्हटले आहे .
कोट: मी पाच एकर कपाशी पीकाची लागवड केली होती पेरणीही साधली मात्र वाणी जातीच्या प्रजातीने माझे संपूर्ण शेत खाऊन फस्त केले . दुबार पेरणी साठी कपाशी बीयाणे शोध सुरु आहे . अन्यथा त्या संपूर्ण क्षेत्रात सोयाबीन पेरावे लागेल .
पहीलीच पेरणी आर्थिक अडचणीत केली . दुबार पेरणीचा खर्च शासनाकडून अनुदान रुपात मिळावा ही अपेक्षा आहे.असे
नामदेव तिडके
काजळेश्वर येथील शेतकरी नामदेव तिडके यांनी म्हटल्याचे आमचे कृषी प्रतिनिधी प्रा. अशोकराव उपाध्ये काजळेश्वर यांनी कळवीले आहे.