कारंजा (लाड) (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे) : तळागाळातील ग्रामिण भागातील जनतेच्या हृदयपटलावर ठसलेल्या आणि दिव्यांग,निराधार,शेतकरी, कामगारा करीता 80% समाजकारण आणि 20% राजकारण करीत महाराष्ट्राच्या राजकारणात स्वतःच्या अस्तित्वाचा आगळा वेगळ ठसा उमटविणाऱ्या आदर्श राजकीय पक्ष म्हणून गणल्या जाणाऱ्या, "प्रहार जनशक्ती पक्षाकडून" कारंजा (लाड) येथून जवळच असलेल्या, ग्राम दोनद बु. येथे, पंचक्रोशीतील ग्रामिण जनसामान्यांकरीता भव्य रोग निदान शिबिर,रक्तदान शिबिर, रक्ततपासणी शिबीर , प्रहार तर्फे तालुक्यातील गरजू रुग्नाकरीता, मोफत प्रवासा करीता रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा, दिव्यांग व शेतकरी मेळाव्याचे आयोजन येत्या रविवारी दि. 18 फेब्रुवारी 2024 रोजी आ. बच्चुभाऊ कडू अध्यक्ष दिव्यांग कल्याण मंत्रालय अभियान महाराष्ट्र राज्य,यांच्या उपस्थितीत भव्य आयोजन करण्यात आले आह.अशी सविस्तर माहिती प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते तथा जिल्हाध्यक्ष हेमेंद्र ठाकरे यांनी कारंजा येथे दिनांक 13 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 06:00 वाजता महालक्ष्मी मंगल कार्यलय येथे आयोजीत केलेल्या पत्रकार परिषदेमधुन बोलतांना दिली. येत्या रविवारी ग्रामिण
गावकरी व प्रहार जनशक्ती
पक्षाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचा उद्देश शेतकऱ्याचे व दिव्यांगाचे प्रश्न सोडवणे हा आहे. रविवार दि . 18 फेब्रुवारी 2024 रोजी दोनद बु. येथे सकाळी 10:00 वाजता आरोग्य तपासणी शिबिर, रक्तदान व रक्त तपासणी शिबिर, दुपारी 03:00 वाजता मा.आ. बच्चुभाऊ कडू यांचा शेतकरी व
दिव्यांग बांधवां सोबत संवाद व मार्गदर्शन इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन असणार आहे तसेच यावेळी कृषी विभागातील अधिकाऱ्यांची आढावा बैठक सुद्धा होणार आहे. त्यानंतर रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा होणार आहे. यावेळी आ. बच्चुभाऊ कडू यांच्या हस्ते तालुक्यातील समाजसेवी व सेवाव्रती कार्यकर्त्यांचा भव्य सत्कार सुद्धा करण्यात येणार असल्याचीही त्यांनी माहिती दिली. तसेच शेवटी हास्य कवी मिर्झा बेग यांच्या हास्य कवी संमेलनाचा कार्यक्रम सुद्धा
होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. या पत्रकार परिषदेला हेमेंद्र ठाकरे वाशिम जिल्हा अध्यक्ष प्रहार जनशक्ती पक्ष, निलेश लवटे, गजानन भाऊ लोखंडकर, दत्ताभाऊ पाकधने, संजय गोटे हे उपस्थित होते. तसेच पत्रकार परिषदेला शहरातील व ग्रामीण भागातील बहुसंख्य पत्रकार उपस्थित होते.असे वृत्त पत्रकार परिषदेला उपस्थित प्रत्यक्षदर्शी असलेले आमचे जिल्हा प्रतिनिधी तथा दिव्यांग जनसेवक संजय कडोळे यांनी कळवीले आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....