डॉ पंजाबराव देशमुख कॉन्व्हेंट , ब्रम्हपुरी येथे दिवाळी सिलेंब्रशन अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले .या दरम्यान कॉन्व्हेंट तर्फे आकाश कंदील तयार करण्याचे आवाहन करण्यात आले त्यास प्रतिसाद म्हणून 70 विध्यार्थी यांनी विभिन्न प्रकारचे आकर्षक आकाश कंदील अल्प वेळात तयार करण्यात आले.या प्रसंगी विविध प्रकारच्या स्पर्धा यामध्ये रांगोळी स्पर्धा व दिवा डेकोरेशन स्पर्धा घेण्यात उत्साहात घेण्यात आल्या तेव्हा सुध्दा मोठ्या प्रमाणात विध्यार्थी यांनी आनंद घेतला .माता लक्ष्मी व गाण्याची आरती करण्यात आली व उपस्थित सर्व विध्यार्थी यांना चॉकलेट व अल्पोपहार चे वितरण करण्यात आले. या प्रसंगी संस्था अध्यक्ष प्रा प्रकाश बगमारे, संस्था उपाध्यक्षा तथा कॉन्व्हेंट प्राचार्या मनीषा ताई बगमारे,सुपरवायझर निलीमा गुज्जेवार यांची प्रमुख उपस्थिती होती .कार्यक्रम यशस्वी रीतीने पार पाडण्यासाठी शिक्षिका निशा मेश्राम,पिंकी ठाकरे,प्रगती शेंडे,योगिता बोकडे, वैशाली कुंभारे,अश्विता सयाम ,रंजना कोहळे,शेडमाके,वर्षा काटेखाये,मेघा राऊत,कामिनी कन्नमवार,घर्षणा सेलोकर ,संजय नागोसे यांनी विशेष परिश्रम घेतले व सर्वांना दिपावली च्या हार्दिक शुभेच्छा दिल्या गेल्या.