कारंजा : भारतिय स्वतंत्रता दिवसाच्या पूर्वसंध्येला कारंजा न प चे प्रथमश्रेणी मुख्याधिकारी दादारावजी डोलारकर, अधिकारी व कर्मचार्याच्या अथक परिश्रमातून कारंजा नगर पालिका इमारत तिरंग्याच्या रंगीत प्रकाश झोतांनी सजविण्यात येऊन,१४ ऑगष्ट फाळणी स्मृती जपण्याकरीता, भव्य असे फाळणी दिनाचे दर्शन घडविणारी, विभाजन विभिषिका स्मृती प्रदर्शनी लावण्यात आली होती. रविवारी या प्रदर्शनीला स्थानिक आमदार राजेंद्र पाटणी यांनी भेट देऊन, मुख्याधिकारी दादाराव डोलारकर यांना "कारंजा शहराच्या विकासाकरीता लवकरच आपण, शंभर करोड रुपयाचा निधी मंजूर करून देण्याचे आश्वासन देत. तुम्ही शहराच्या विकासाच्या योजना तयार करून, तसा अहवाल सादर करावा. तुम्हाला विकास निधीची कमी पडू दिली जाणार नाही." असे आश्वासन दिले.यावेळी महाराष्ट्र साप्ता . ग्रामिण पत्रकार परिषदेचे अध्यक्ष संजय कडोळे हे मुख्याधिकारी यांच्या दालनात उपस्थित होते. सदर्हु प्रदर्शनाचा लाभ हजारो कारंजेकरांनी घेतला.तसेच त्यानंतर सांयकाळी,वरिष्ठ आरोग्य अधिकारी विनय वानखडे, सहाय्यक आरोग्य निरिक्षक राहुल सावंत यांच्या कार्यकौशल्यात "देशभक्तीपर गीत गायनाचा रंगारंग कार्यक्रम"आयोजीत करण्यात आला असता, या कार्यक्रमाला तहसीलदार धिरज मांजरे यांनी प्रामुख्याने उपस्थिती दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याधिकारी दादाराव डोलारकर हे होते. देशभक्ती गीतगायन कार्यक्रमाचे संचलन प्रणिता कुसूम दिनेशचंद्र दसरे यांनी केले तर कार्यक्रमात नगर पालिका कर्मचार्यासह गावातील कलावंत राहुल सावंत, विद्युत विभागाचे सिरसाट, सौ अर्चना तोमर मॅडम, दादाराव सोनिवाळ, रोमिल लाठीया, विजय राठोड, इम्तियाज लुलानिया, डॉ ज्ञानेश्वर गरड, हफिजखान आदीनी हजेरी लावली. कार्यक्रमात स्थानिक कलावंतानी एकशे एक बढकर गाणी गायील्याने विशेष म्हणजे सततधार अशा भरपावसात रसिक श्रोते स्वतंत्रता अमृत महोत्सवाचा लाभ घेत असल्याचे दिसून आले. कार्यक्रमाला विदर्भ लोककलावंत संघटनेचे अध्यक्ष संजय कडोळे, विजय पाटील खंडार, एड संदेश जिंतुरकर, राजीक शेख, सुनिल गुंठेवार इ उपास्थित होते