संच मान्यता,थकीत देयके, पदमान्यता, भविष्य निर्वाह निधी प्रकरणे व नियमित वेतन इ. अनेक विषयांवर सखोल चर्चा करून अधिकाऱ्यांना दिल्या सूचना
वाशिम: आज दिनांक 17 एप्रिल रोजी वाशिम जिल्ह्यातील शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांसमवेत तसेच अमरावती विभागाचे लोकप्रिय शिक्षक आमदार श्री किरणरावजी सरनाईक व विविध संघटनांचे पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत समस्या आढावा बैठक महात्मा फुले सभागृह जिल्हा परिषद वाशिम येथे संपन्न झाली.
या सभेमध्ये अनेक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी प्रश्नांची सरबत्ती केली व त्या प्रश्नांचे स्पष्टीकरण अधिकाऱ्यांकडून घेतले.24 -25 च्या संचमान्यता,उच्च माध्यमिक च्या संचमान्यतेत लागलेला शिक्षार्थ दंड रद्द करणे, थकीत देयके, भविष्य निर्वाह निधी प्रकरणे,शालार्थ आयडी, पदोन्नती प्रकरणे, पदमान्यता, अनुकंपाक नियुक्ती त्यासोबतच विद्यार्थ्यांचे अपार आयडी, अकरावी ची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया रद्द करणे ,तसेच अतिरिक्त प्रवेश होणार नाही यावर निर्बंध लादणे ई.अशा अनेक विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली.
/ या प्रश्नांसंबंधीत मा. श्री किरणरावजी सरनाईक यांनी शिक्षणाधिकारी श्री आहाळे साहेब, यांना सूचना दिल्या.त्यामध्ये संचमान्यता तात्काळ वितरित करणे, पद मान्यता प्रलंबित असल्यास वितरित करणे, पटापडताळणी च्या दरम्यान अधिकृत कर्मचारीच नियुक्त करणे, अतिरिक्त प्रवेश होणार नाहीत याची खबरदारी घेणे, येणाऱ्या काळात कॉपीमुक्त अभियान तीव्रतेने राबविणे व एकंदरीतच गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळेल यासाठी भरीव प्रयत्न करणे अशा सूचना दिल्या. यावेळी विजुक्ताचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य श्री अनिल काळे सर, शिक्षक संघर्ष सेनेचे प्रशांत कव्हर सर,शिक्षक आघाडीचे रमेश आरू सर, मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष श्री विनोद नरवाडे सर, भाजपा शिक्षक सेल चे पदाधिकारी महेश उगले सर, विनायक उज्जैनकर सर, साहेबराव जाधव सर, विजय शिंदे सर, सज्जन बाजड सर, दिनकर सरकटे सर, प्रफुल्ल काळे सर, श्री जाधव सर, श्री गोरे सर, रामेश्वर आवचार सर, संतोषराव नायक सर, श्रीकांत जोशी सर, जिल्हाध्यक्ष श्री गजानन कोरडे सर,मंगरूळपीर तालुकाध्यक्ष राम व्यवहारे सर, त्यासोबतच शिक्षणाधिकारी श्री आहाळे साहेब, प्राथमिक शिक्षणाधिकारी श्री भुसारे साहेब, नियोजन चे शिक्षणाधिकारी दाबेराव साहेब, वेतन पथक अधीक्षक गवई साहेब, प्राथमिकचे वेतन अधीक्षक घुले साहेब,लेखाधिकारी सावदेकर मॅडम, अविनाश मोडक, मेश्राम, चवरे ई.तथा मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
आपल्या प्रतिक्रिया द्या....