कारंजा (लाड) : ऐतिहासिक, धार्मिक,आध्यात्मिक, सांस्कृतिक,व्यापारी नगरी तथा शैक्षणिक पंढरी असणाऱ्या तिर्थक्षेत्र कारंजा शहरात सातत्याने वर्षभर होत असणारे सार्वजनिक कार्यक्रम, व्याख्यानमाला,नाटक, एकांकिका,श्रीमदभागवत कथा किंवा एखाद्या वरिष्ठ राजकिय नेत्याच्या किंवा विशीष्ट वक्त्याच्या जाहिर कार्यक्रमाकरीता राखीव भूखंड (खुले व्यासपिठच) उपलब्ध नसल्यामुळे एखाद्या विराट अशा मोठ्या कार्यक्रमाचे आयोजनापासून येथील जनतेला वंचितच रहावे लागत आहे.तसेच धार्मिक,आध्यात्मिक,सांस्कृतिक,कलानगरी म्हणून ओळख असणाऱ्या कारंजा शहरात सांस्कृतिक नाट्यगृह नसल्यामुळे मराठी संस्कृती मधील नाटक, एकाकिंका,लोककला महोत्सव, वक्त्यांची व्याख्याने, महाविद्यालयीन किंवा शाळेचे सांस्कृतिक कार्यक्रम व विविध स्पर्धा होत नसल्याने शहरातील कलाकार,लोककलावंत, बालकलावंत,स्पर्धकांच्या कलेला वाव मिळत नाही.आणि कलारसिक प्रेक्षक व श्रोत्यांची कुचंबना व गैरसोय होत आहे. शिवाय प्रत्यक्ष शासनाकडूनच कलावंत-कलारसिक-कारंजेकरांची हेळसांड होत आहे.मानवी जीवन जगत असतांना प्रत्येक माणसाला रोजच्या धावपळीच्या व्यस्त दिनचर्येच्या ताणतणावामधून मुक्तता करून ताजेतवाने जिवन जगण्याकरीता विरंगुळा म्हणून सामान्य ज्ञान,समाजप्रबोधन आणि मनोरंजन हवे असते.परंतु आजपर्यंतचे स्थानिक सत्तेतील राजकीय पक्ष व पक्षाचे स्वार्थी नेते तसेच स्थानिक स्वराज्य संस्था नगर पालिका आणि महाराष्ट्र शासनाच्या उदासिनतेमुळे,आजतागायत सांस्कृतिक नाट्य सभागृहाकरीता भूखंडच मिळाला नाही. व भूखंडाची उपलब्धता नसल्यामुळे नाट्यगृहाचे बांधकाम झालेले नाही.मनोरंजनाकरीता कारंजा शहरात सांस्कृतीक नाट्यगृह नसणे ही खेदाची व तेवढ्याच संतापाची गोष्ट आहे. त्यामुळे आतातरी,महाराष्ट्र शासनाने आपल्या कारंजा शहरातील जनतेच्या समाजप्रबोधन व मनोरंजन-करमणूकीकरीता अग्रक्रमाने,भूखंडासह स्वतःचे व्यासपिठ असणारे सांस्कृतिक नाट्यसभागृह उपलब्ध करून देणे ही आज रोजी काळाची गरज असल्याचे,महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त विदर्भ लोककलावंत संजय कडोळे यांनी म्हटले असून कारंजा शहराच्या लोकप्रिय महिला आमदार सईताई डहाके यांनी आपल्या आमदार विकास निधी मधून,शासन स्तरावरून सर्वप्रथम भूखंडाचा प्रश्न सोडवून देत एखादा भूखंड उपलब्ध करून घेवून,सांस्कृतिक नाट्य सभागृह बांधकाम करून देण्याची आग्रही मागणी आमदार सईताई डहाके,जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस,मुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार तथा दूसरे उपमुखमंत्री एकनाथ शिंदे यांचेकडे विदर्भ लोककलावंत संघटना कारंजाचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.