छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५२ वा राज्याभिषेक सोहळा कारंजा नगरीत संपन्न !
कारंजा : सुमारे ३५२ वर्षापूर्वी,राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा महाराज्याभिषेक रायगडावर साजरा होऊन प्रजेच्या रामराज्यासाठी "हिंदवी स्वराज्याची" स्थापना करण्यात आली होती.हा सुवर्णाक्षरांकित दिन,अखंड भारतात, "शिवराज्याभिषेक दिन" म्हणून साजरा केल्या जातो. त्यालाच "शिवराज्याभिषेक सोहळा" म्हणून साजरा केल्या जात असतो. त्या निमित्त,शुक्रवार दि. ०६ जून २०२५ रोजी कारंजा येथे,छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५२ व्या शिवराज्याभिषेक सोहळा कार्यक्रमानिमित्त,छत्रपती शिवाजी महाराज चौक कारंजा येथे मोठ्या उत्साहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित मान्यवर मा.नगराध्यक्ष दत्तराज डहाके व देवव्रतजी डहाके हे प्रामुख्याने उपस्थित होते.त्यांच्या हस्ते शिवरायांच्या जयघोषात,शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हारार्पण करण्यात आले,यावेळी फटाक्याची आतिषबाजी करण्यात येऊन व पेढे वाटून राज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाला कारंजा शहरातील शिवप्रेमी, राजेंद्र मोडक,प्रा.लूंगे , प्रा. कानकीरड,प्रा.किरण चौधरी संजय कडोळे, प्रदिप वानखडे,विजय गागरे,अमोल अघम समीर देशपांडे,माजी नगरसेवक प्रमोद गायकवाड संदीप काळे , महादेव तांदळे ,श्रीकांत गावंडे ,घुले पाटिल, अजयजी डोंगरदिवे ,सुनिल जाधव इत्यादी उपस्थित होते.यावेळी उपस्थितांसमोर आपल्या मनोगतातून बोलतांना, शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या,हिंदवी स्वराज्याचा आदर्श,सदैव आपल्या हृदयात ठेवून, न्याय व नितीने समाजकार्य केले पाहिजे असे त्यांनी सांगीतले. छत्रपती शिवाजी महाराज की जय ! जय भवाणी - जय शिवाजी !! हर हर महादेवच्या जयघोषाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.