हिंदु संस्कृती धार्मिक व आध्यात्मिक विचारांवर आधारलेली असून,मानवी आयुष्यात जीवन जगत असतांना मानवाने धार्मिकता व तिर्थाटनाला अनन्यसाधारण महत्व दिलेले आहे.त्यामुळे वर्षातून एकवेळ तरी तिर्थाटन व पर्यटन केले जाते. मागील दोन वर्ष कोव्हिड १९ कोरोना महामारीच्या अनुभवातून गेल्यानंतर आता मात्र जनता जनार्दन मोकळा श्वास घेऊन, तिर्थाटन व पर्यटन करीत आहे. त्यामुळे कारंजा येथील, जय भवानी जय मल्हार वारकरी मंडळ तथा विदर्भ लोककलावंत संघटनेचे उपाध्यक्ष उमेश हरिभाऊ यांच्या नेतृत्वात त्यांनी शनिवार दि.२९ एप्रिल २०२३ ते गुरुवार दि . ४ मे २०२३ पर्यंत अशोक गोरडे,सौ लक्ष्मीबाई बारबोले,सौ ज्योतीबाई उमेश अनासाने,श्रीमती नंदाताई थेर (पाटील),श्रीमती मंदाताई राऊत, सौ संगीता काळे,ओम काळे,श्री काळे इत्यादी वारकरी मंडळीना घेऊन,महाराष्ट्र दर्शन यात्रा पूर्ण केली. आपल्या महाराष्ट्र दर्शन यात्रेत त्यांनी कोल्हापूर येथे ज्योतिबा दर्शन, श्री अंबाबाई महालक्ष्मी दर्शन; श्रीक्षेत्र पंढरपूर येथे श्री विठ्ठल रुखमाई दर्शन, तुळजापूर येथे श्री तुळजाभवाणी दर्शन, येरमळा येथे श्री येडेश्वरी दर्शन, औंढा नागनाथ येथे श्री नागनाथ दर्शनाचा लाभ घेतला. शिवाय यात्रामार्गात ठिकठिकाणी आपल्या भजनाद्वारे राष्ट्रीय कार्यक्रम आणि व्यसनमुक्ती बाबत जनजागृती सुद्धा केली. वारकरी मंडळी परतल्या नंतर श्री ओंकारेश्वर संस्थान भक्तमंडळी कडून त्यांचे स्वागत करण्यात आले.असे वृत्त जय भवानी जय मल्हार वारकरी मंडळाचे अध्यक्ष विजय पाटील खंडार यांनी कळविले आहे.