ब्रम्हपुरी:-
१९ फेब्रुवारी २०२५ ला मौजा पारडगाव येथे शिवजन्मोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या ओघ हा सर्वत्र बघायला मिळतो .कार्यक्रमाचे आयोजन सगळीकडे मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरे करण्यात येते. त्यात गेल्या काही वर्षापासून म्हणजे जवळ जवळ पारडगाव येथे होत असलेले शिवजयंतीला वर्ष 2025 ला दहा वर्षे पूर्ण झाले.
यावर्षी सुद्धा दरवर्षीप्रमाणे 18 व 19 फेब्रुवारी दोन दिवशीय छत्रपती शिवाजी महाराज समितीतर्फे छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळा हा साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाची सुरुवात 18 फेब्रुवारी ला सकाळी 7:30 वाजता सुरू ग्रामस्वच्छतेपासून झाली. किल्ले बनवण्याची स्पर्धा ही शालेय विद्यार्थ्यांसाठी गडकिल्ल्यांच्या इतिहासाची ओढ निर्माण व्हावी म्हणून ही स्पर्धा घेतली जाते आणि प्रत्येक स्पर्धकाला बक्षीस वितरित केल्या जाते .त्यानंतर मोफत डोळे तपासणी शिबिर घेण्यात आले अशोक नेत्रालय ब्रह्मपुरी यांच्या व छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव समिती पारडगावच्या संयुक्त विद्यमानाने आयोजन केले होते. त्यात गावातील बऱ्याच व्यक्तींनी या शिबिराचा लाभ घेतला. त्यानंतर संगीत खुर्ची, गोलात दगड ठेवणे ,फुगे फुगवण्याची स्पर्धा ,विविध वयोगटातील कबड्डी स्पर्धा या घेण्यात आल्या .रात्री ठीक 8:00 वाजता कार्यक्रमांतर्गत प्रबोधनकार ,कीर्तनकार शिवश्री इंजि. भाऊसाहेब थुटे बोथलीकर वर्धा यांचे कीर्तन खूप छान पद्धतीने पार पडले.
19 तारखेला सकाळी 7:30 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी मिरवणूक बँड पथकाच्या साह्याने गावभर काढण्यात आली .या कार्यक्रमात लहान मुलांसाठी विविध स्पर्धा घेण्यात येतात. त्या 19 फेब्रुवारीला होता. त्या म्हणजे रांगोळी स्पर्धा, वेशभूषा स्पर्धा, गीत गायन स्पर्धा आणि संगीत खुर्चीचा कार्यक्रम वेळ मिळाल्यामुळे घेण्यात आला.
कार्यक्रमाचा मुख्य गाभा म्हणजे व्याख्यानमाला मार्गदर्शन व सत्कार सोहळा हा असतो. नियोजित स्थळापासून तर कार्यक्रम स्थळापर्यंत पाहुणे मंडळींचे पोहोचवण्याचे काम जि. प. शाळा पारडगावच्या लेझीम पथकाने केले .त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज स्मारकास दीप प्रज्वलन व माल्यार्पण करून कार्यक्रम स्थळी प्रमुख पाहुणे पोहोचले . कार्यक्रम स्थळी महापुरुषांच्या प्रतिमांना माल्याअर्पण करण्यात आले. त्यानंतर जिजाऊ वंदना घेऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाचे मुख्य व्याख्याते शिवश्री प्रा .डॉ. मोहनजी कापगते ने. ही.महाविद्यालय ब्रह्मपुरी ,मार्गदर्शक शिवश्री ऍड. आशिष गोंडाने हे होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवश्री तोंडरे सर, मुख्याध्यापक ज्ञानगंगा विद्यालय बेटाळा ,उपाध्यक्ष शिवश्री जगदीशजी पिलारे अध्यक्ष छत्रपती शिवाजी फाउंडेशन ब्रह्मपुरी . प्रमुख अतिथी शिवश्री बंडूजी दोनाडकर उपकेंद्र पारडगाव व शिवश्री तुळशीदासजी राऊत शिक्षक ज्ञानगंगा विद्यालय बेटाळा तर ज्यांचा सत्कार करण्यात आला असे आमचे सत्कारमूर्ती पारडगाव शाळेतील माझी शिक्षक शिवश्री रामचंद्र गोविंदजी खोब्रागडे ब्रह्मपुरी आणि माझी शिक्षिका शिवमती शांताबाई रामचंद्रजी खोब्रागडे ब्रह्मपुरी हे होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देवनंदन ठेंगरी प्रास्ताविक मंगल पारधी आभार प्रदर्शन सुधीरजी पिलारे यांनी केले. व्याख्याता आणि मार्गदर्शकांनी आपल्या भाषणातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. त्यानंतर सामूहिक सहभोजनास सुरुवात झाली.
रात्री 7:30 वाजता सांस्कृतिक कार्यक्रम आणि बक्षीस वितरण व सत्कार सोहळा पार पडला. या कार्यक्रमातील सत्कारमूर्ती होते माजी सेवानिवृत्त सैनिक जगदीशभाऊ सहारे ब्रह्मपुरी, शिवकन्या वैष्णवी उमाजी पारधी (सशस्त्र पोलीस दल मुख्यालय नायगाव मुंबई) व शिवकन्या मेघा ज्ञानेश्वर ठेंगरी (वैज्ञानिक अधिकारी उपजिल्हा रुग्णालय आरमोरी) हे होते .या कार्यक्रमाचे उद्घाटक शरदभाऊ ठेंगरी ,संचालक गणराज मोटर्स नागभीड .सहउद्घाटक शिवश्री श्रीधरजी राऊत ,शिवश्री मोजेके स्टाईल बेटाळा . अध्यक्ष प्रमोदजी चिमूरकर ,माजी जिल्हा परिषद सदस्य ब्रह्मपुरी. उपाध्यक्ष ,विनोदजी मदनकर ,शिक्षक जिल्हा परिषद शाळा चिचगाव.आणि पिंटूजी पिल्लेवान ,सरपंच ग्रामपंचायत पारडगाव. हे होते. या कार्यक्रमात ज्या दोन दिवशी विविध घेण्यात आलेल्या स्पर्धेचे मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले .चिमुकल्याने या कार्यक्रमास एकांकिका, सामूहिक नृत्य ,वैयक्तिक नृत्य अशाप्रकारे आपल्या कला सादर केल्या आणि या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन निलेश राऊत यांनी केले.
आपल्या प्रतिक्रिया द्या....