अकोला: स्थानिक दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोलाचे संस्थापक अध्यक्ष, मतदार साक्षरता अभियान जिल्हा अकोला चे ब्रँड अँबेसिडर व श्री.शिवाजी महाविद्यालय ,अकोला चे सहाय्यक प्राध्यापक डॉ. विशाल कोरडे यांचा २५ जानेवारी २०२५ राष्ट्रीय मतदार दिनी जिल्हा प्रशासन अकोला तर्फे जाहीर सत्कार करण्यात आला . नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय अकोला येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामदास सिद्धभट्टी अप्पर जिल्हाधिकारी तर प्रमुख अतिथी म्हणून महेश परांडेकर उपजिल्हाधिकारी, विजय पाटील निवासी उपजिल्हाधिकारी , अनीता भालेराव उपजिल्हाधिकारी, गौरी धायगुडे तहसीलदार ,श्याम राउत गटशिक्षण अधिकारी, श्याम धनमने तहसीलदार हे मान्यवर उपस्थित होते . संपूर्ण अकोला जिल्ह्यात ग्रामीण व शहरी विभागात मतदार साक्षरता अभियान राबवून डॉ .विशाल कोरडे यांनी जिल्हा प्रशासनाला सहकार्य केले विशेष म्हणजे मतदानाच्या दिवशी दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचून मतदान प्रक्रियेत प्रत्यक्ष सहभाग नोंदवला त्यांच्या या अनमोल कार्याबद्दल जिल्हा प्रशासन अकोला तर्फे त्यांचा प्रमाणपत्र देऊन जाहीर सत्कार करण्यात आला .
आपल्या सत्काराला उत्तर देताना डॉ विशाल कोरडे यांनी दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला तर्फे नेहमीच जिल्हा प्रशासन व समाज कल्याण विभागाला संपूर्ण सहकार्य केले जाईल असे आश्वासन दिले तर अप्पर जिल्हाधिकारी श्री रामदास सिद्धभट्टी यांनी डॉ विशाल कोरडे व दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला चे आभार व्यक्त केले . दिव्यांग बांधवांसाठी संस्थेला जिल्हा प्रशासनातर्फे नेहमीच सहकार्य केले जाईल असे आश्वासन त्यांनी दिले . डॉ विशाल कोरडे यांच्या सत्काराबाबत जिल्हाधिकारी श्री अजित कुंभार ,दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला चे प्रा अरविंद देव, डॉ.संजय तिडके, भारती शेंडे , श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीचे अध्यक्ष श्री हर्षवर्धन देशमुख, प्राचार्य डॉ.रामेश्वर भिसे, आय एम ए अकोला चे अध्यक्ष डॉ.राजेंद्र सोनवणे, डॉ.अर्चना मोरे, व डॉ.नितीन उपाध्ये यांनी शुभेच्छा दिल्या आहेत . राष्ट्रीय कार्यात दिव्यांग सोशल फाउंडेशन व डॉ.विशाल कोरडे यांनी दिलेल्या अनमोल कार्याबाबत त्यांचे समाजात सर्वत्र कौतुक केले जात आहे .