कारंजा येथून जवळच असलेल्या,ग्राम जनुना खुर्द,पोष्ट कुपटा ता. कारंजा या मागासलेल्या व आडमार्गी छोट्याशा गावखेड्यात पूर्वी रुग्नांकरीता कोणतीच व्यवस्था नसल्यामुळे रुग्नांचे हाल हाल व्हायचे.हे दु:ख त्यावेळी सर्वच गावकर्यांनाही वाटायचे.या गोष्टीचा परिणाम त्यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिकत असणाऱ्या,चि.चैतन्य आणि कु. अंकिता यांच्या बालमनावर एवढा झाला होता की त्यांनी भविष्यात डॉक्टर होण्याचे स्वप्न बालपणीच बघीतले.परंतु चि.चैतन्य आणि कु. अंकिता ही भावंड ठरली अल्पभूधारक चौधरी परिवारातील,त्यांचे वडील कांचन चौधरी हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक.परिवाराची जबाबदारी आणि आपल्या बालकांची महत्वाकांक्षा त्यामुळे त्यांनी सुद्धा आहे त्या परिस्थितीत मुलांना शिकविण्याचे ठरविले. जिल्हा परिषद शाळेतून बाहेर पडलेल्या ह्या मुलांनी माध्यामिक शिक्षण कारंजा येथे घेतले. आर्थिक परिस्थिताने एम बी बी एस नाही तर निदान बि ए एम एस, एम डी शिकून डॉक्टर होण्याचे स्वप्न बाळगले.आणि नागपूरच्या आयुर्वेदिक महाविद्यालयातून नुकतीच बी ए एम एस पदवी मिळवून प्राविण्य प्राप्त केले. त्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.त्यांनी प्राप्त केलेल्या यशाने चौधरी परिवारासह जनुना खुर्द येथील गावकऱ्यांनी व बाल मित्र मंडळींनीही त्यांचे अभिनंदन केले असून यापुढे आपण एम डी करणार असल्याचे डॉ चैतन्य कांचन चौधरी आणि डॉ.कु. अंकिता कांचन चौधरी या भावंडानी सांगीतले आहे.