मुल गडचिरोली महामार्गावर काल रात्री 10 ते 11 च्या सुमारास आकापुर जवळील एम. आइ. डी. सी. टीपाईंट जवळ महामार्ग ओलांडत असताना बिबट्याला अज्ञात वाहनाने धडक दिली. या घटनेत बिबट्या घटनास्थळी मृत झाला. बिबट्याच्या कमरेच्या बाजूला व तोंडाला जबर घाव बसल्याने त्याचा घटनास्थळी मृत्यु झाला मुल कडॆ जाणाऱ्या वाहनांचीमोठी वाहतूक कोंडी काही काळ निर्माण झाली.
एका प्रवाशाने प्रसंगावधान राखत वनविभागाला घटनेची माहिती दिल्या वन कर्मचारी घटना स्थळी पोहचले.