कारंजा : कारंजा ते शेलूबाजार मार्गे औरंगाबाद हायवेवर,कारंजा शहरापासून,अवघ्या तिन किलोमिटर अंतरावर, "कृष्णा कृषी बाजार,कारंजा (लाड)" ही शेतकऱ्यांची सुपर मार्केट असून,ह्या मार्केटमध्ये शेतकर्याच्या,शेतमालाला चांगला बाजारभाव मिळून,शेतमालाची अविलंब म्हणजेच ताबडतोब खरेदी केल्या जाऊन,लगेच शेतकऱ्यांना शेतमालाचे नगदी पैसे (भुगतान) केले जाते.त्यामुळे कारंजा, मानोरा, व आजुबाजूच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा सोयाबिन,तुर,चना,गहू,मुग,उडीद भुईमुग इत्यादी शेतमाल, शेतकरी बांधव "कृष्णा कृषी बाजार कारंजा (लाड)" मध्ये विक्रीस आणीत असतात.येथील व्यापारी,अडते,हमाल यांची सौजन्यपूर्ण आणि चांगली वागणूक यामुळे शेतकऱ्यांना समाधान मिळत असल्याचे शेतकरी बांधव अभिमानाने सांगतात.त्यामुळे दिवसेंदिवस, शेतकऱ्याच्या "कृष्णा कृषी बाजार कारंजा" ह्या बाजारपेठेचा नावलौकिक अमरावती विभागात वाढत असल्याचे दिसून येत आहे.