ब्रम्हपूरी तालुक्यातील अ-हेरनवरगाव येथील काल झालेल्या अतिवृष्टीमुळे घर कोसळले विरुद्ध दिशेला भिंती कोसळल्याने मोठा अनर्थ टळला सुदैवाने घरचे सर्व जन सुखरुप बाहेर आले आठवड्यापासून पडत असलेल्या सततधार पावसाने ब्रम्हपुरी तालुक्यातील अहेरनवरगाव येथील श्रावण कांबळी यांच्या घराची भिंत मध्यरात्रीच्या सुमारास कोसळली असून यात सुदैवाने जीवित हानी झाली नाही. मात्र यात कांबळी परिवाराचे हजरोंचे नुकसान झाले आहे. तालुक्यात अधून मधून मुसळधार ते अतिमूसळधार पावसाने मागील आठवड्यापासून थैमान घातले आहे.