सिंदेवाही परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या एफएल २ या वाघाला जेरबंद करण्यात अखेर यश आले आहे. वन विकास महामंडळाच्या कक्ष क्रमांक १७२ मध्ये वाघाने रघुनाथ नारायण गुरनुले रा. नवेगांव (लोन.) यांचा बळी घेतला होता.सरडपार, नवेगाव लोन, चिटकी व जाटलापूर या मार्गावर या वाघाचा वावर होता. वाघाने अनेकदा नागरिकांवर हल्ल्याचे प्रयत्नही केले. मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्याकरिता मंगळवारी एफएल २ वाघाला दुपारी १२.५० वाजता जेरबंद करण्यात आले. एफएल २ वाघाचे (वय अंदाजे तीन ते चार वर्ष असून वैद्यकीय तपासणीनंतर त्याला गोरेवाडा प्राणी संग्रहालय व बचाव केंद्र, नागपूर येथे हलवण्यात येणार आहे.