अकोला --महात्मा गांधीजींच्या अस्थिविसर्जन स्मृती दिना प्रित्यर्थ अकोला जिल्हा सर्वोदय मंडळ व नशाबंदी मंडळाचे वतीने गांधीग्राम पंचक्रोशीत व्यसनमुक्ती संवाद यात्रा काढण्यात आली.सर्वोदय व नशाबंदी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गांधीग्राम, गोपाळखेड ,निंभोरा, वल्लभनगर, सांगवी, मोहाडी, पाचमोरी, उगवा या गावांमध्ये जाऊन महात्मा गांधीजींच्या विचाराचा जागर केला.
महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय गांधीग्राम येथे ज्येष्ठ सर्वोदयी महादेवराव भुईभार यांच्या अध्यक्षतेखाली सर्वधर्म प्रार्थना सभा घेण्यात आली.
प्राचार्य विलास झांबरे
महात्मा गांधीजींच्या अस्थि वाघोली या गावी पूर्णा नदी काठावर विसर्जित केल्या होत्या तेव्हापासून या गावाला गांधीग्राम म्हणून ओळखले जाते महात्मा गांधीजींच्या विचाराचा वसा आणि वारसा पुढे चालू ठेवण्यासाठी सर्वोदय मंडळाच्या वतीने दरवर्षी या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते असे प्रतिपादन प्राचार्य विलास झांबरे यांनी प्रस्ताविकातून केले
बबनराव कानकिरड
व्यसनमुक्त समाज निर्मितीसाठी प्रबोधन करून गांधीजींचे नशाबंदीचे विचार गावागावात पेरण्यासाठी ही संवाद यात्रा असल्याचे प्रतिपादन व्यसनमुक्ती संवाद यात्रेचे संयोजक बबनराव कानकिरड यांनी केले.
महादेवराव भुईभार
महात्मा गांधी अगदी साधे जीवन जगले. कार्यकर्त्यांनी व्यसनमुक्त असले पाहिजे असा त्यांचा आग्रह होता. आई-वडिलांचा आदर करा आणि व्यसनांपासून दूर राहा असा संदेश महादेवराव भुईभार यांनी अध्यक्षीय भाषणातून दिला.
महाराष्ट्र सर्वोदय मंडळाचे माजी अध्यक्ष शिवचरणसिंह ठाकुर, समाजप्रबोधनकार ह.मो.खटोड गुरुजी,सर्वोदय मंडळाचे सचिव डाॅ.मिलिंद निवाणे, जयकृष्ण वाकोडे अकोट,पत्रकार अनिल मावळे,रोहित तारकस, रामचंद्र नारायण राऊत बाभुळगाव,संजय रमेश मांजरे, सर्वोदयमित्र संजय रामचंद्र इंगळे किनखेड, डॉ. शरद काठोळे, प्रा. संजय म्हैसने, प्रा. जगन्नाथ बर्डे, प्रा. प्रफुल डोंगरे, डॉ. विजय चव्हाण ,अतुल फोकमारे,अनिल मैने,संदिप इंगळे,गणेश खुले यांचेसह शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थी ,ग्रामस्थ मोठ्या संख्येत उपस्थित होते.
कु. रिद्धी अतुल काठोळे,व कु. पूर्वी फुलझेले यांनी महात्मा गांधींची भजने सादर केली.बबनराव कानकिरड यांनी उपस्थितांना नशाबंदीची प्रतिज्ञा दिली. महात्मा गांधी विद्यालयापासून पूर्णा नदी घाटापर्यंत व्यसनमुक्ती रॅली काढण्यात आली. पूर्णा नदी घाटावर सर्वांनी पुष्पार्पण करून जलपूजन केले. सर्वधर्म प्रार्थना सभेचे संचालन प्रा. प्रफुल्ल डोंगरे यांनी केले.
जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक मराठी शाळा गोपाळखेड येथे व्यसनमुक्ती संवाद यात्रेचे स्वागत केंद्रप्रमुख राजेश गोसावी,अभिलाष प्रदीप देशमुख, भूषण मार्के यांनी केले. स्व.भाई दे.मा. कराळे सार्वजिक वाचनालयाला सर्वोदय कार्यकर्त्यांनी भेट दिली.
जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा वल्लभ नगर येथे सामाजिक कलावंत नाजूकराव गवळी , कुकळकर , मुख्याध्यापिका सौ. नंदा केशवराव मालोकार, सौ कांचन संजय डोके, अर्चना सरोदे, किशोरी राहुल बेहरवाल यांनी यात्रेचे स्वागत केले.यावेळी व्यसनमुक्तीवर घोषणा देण्यात आल्या.
निंभोरा येथे व्यसनमुक्ती संवाद यात्रा पोहोचली असता सौ. निलीमा शामराव गोतमारे,रामचंद्र नामदेव चौधरी, केशव श्रीराम साकरकर, राजेंद्र पुंजाजी ताडे, पालक प्रतिनिधी संतोष रामेश्वर सुलताने, कल्पना आवारे, सौ. शुभांगी मनोहर गावंडे यांनी यात्रेत सहभाग घेतला. जिल्हा परिषद शाळेत व्यसनमुक्ती वर बालसभा घेण्यात आली. बबनराव कानकिरड यांनी विनोदी चुटुकले व बडबड गीते सादर करून बालकुमारांचे मनोरंजन केले. "गली गली मे गुंजना नाश- व्यसनमुक्ती जिंदाबाद", "नशा मुक्त रहा- निरोगी रहा"या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
ज्येष्ठ सर्वोदयी प्रा. राजाभाऊ देशमुख, हिम्मतराव गावंडे, विठ्ठलराव हिवरे ,अजय आवारे, सुमित्रा निखाडे ,प्रदीप भाई वखारिया, प्रा. जगन्नाथ बर्डे, रामराव पाटेखेडे, श्रीकृष्ण विखे पाटील,मानव साधवांनी, सविता शेळके, ऋषिकेश निमकंडे यांनी यात्रेला शुभेच्छा दिल्या. यात्रेचे सूत्रसंचालन अकोला जिल्हा सर्वोदय मंडळाचे सचिव डॉ मिलिंद निवाणे व अनिल मावळे यांनी केले.
आपल्या प्रतिक्रिया द्या....