वाशिम: सुभद्राआई बहुउद्देशीय संस्था व सर्वधर्मिय सामुहिक विवाह सोहळा समितीच्यावतीने कृषी उत्पन्न बाजार समिती वाशिमच्या प्रांगणात, शुक्रवार २४ फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या, सर्वधर्मिय सामुहिक विवाह सोहळयामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या वधू वरांची लग्नगाठ बांधण्यात आल्याने, जिल्हयाच्या इतिहासात नवा विक्रम प्रस्थापित झाला.
न भुतो न भविष्यती अशा प्रकारच्या या दैदिप्यमान सोहळयात वधूवर पक्षाच्या ६० हजार नातेवाईक तथा सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी, पत्रकार यांचे उपस्थितीत वाशिम येथील जनसेवक संजय वाडे यांच्या संकल्पनेची पूर्तता होवून, विविध जाती धर्माचे तब्बल ५०१ जोडपी विवाहबद्ध होऊन लेकीबाळींचे कन्यादान अतिशय शिस्तबद्ध नियोजन करीत, आनंदोत्साहात वाशीमच्या या ऐतिहासीक नगरीत व पवित्र भुमिमध्ये साकार झाले.

सदर विवाह सोहळयाच्या सभा मंचावर उद्घाटक म्हणून यवतमाळ-वाशिम खासदार भावनाताई गवळी,अध्यक्षस्थानी आयोजक तथा सर्वधर्मिय सामुहिक विवाह सोहळा समितीचे संजय आधारवाडे, माजी मंत्री सुभाषराव ठाकरे, भाजपा जिल्हाध्यक्ष तथा कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघाचे आ.राजेंद्र पाटणी, पिरिपाचे कवाडे गटाचे संस्थापक प्रो.जोगेंद्र कवाडे, शिक्षक आ.अॅड. किरणराव सरनाईक, उद्योजक देवेंद्र खडसे पाटील, माजी आ.विजयराव जाधव, मा.आ.पुरूषोत्तम राजगुरू, सर्वधर्मिय विवाह सोहळा समितीचे सरचिटणीस,अ.भा. युवा पुरस्कार तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त समाजसेवी निलेश सोमाणी,व्यापारी मंडळ जिल्हाध्यक्ष जुगलकिशोर कोठारी,उद्योजक संजय रूहाटिया,सौरभ रूहाटिया,

रामदास चांदवानी,गिरधारीलाल सारडा,आचार्य विजयप्रकाश दायमा,आठवले गट जिल्हाध्यक्ष तेजराव वानखडे,रिपाई कवाडे गट जिल्हाध्यक्ष दौलत हिवराळे, जयप्रकाश अग्रवाल,शिवसेना जिल्हाप्रमुख विजय खानझोडे, महादेव ठाकरे,भागवत गवळी, राम जगदाळे,श्याम दुरतकर, प्रकाश महाले,आर.बी. गायकवाड,शुभांगी ठाकरे,युवा सेना जिल्हाप्रमुख रवि भांदुर्गे,डॉ. हरिष बाहेती, उद्योजक मिलींद भावसार,शिवलाल भुतडा, राजुभाऊ चौधरी,मनसे जिल्हाध्यक्ष रजुभाऊ किडसे, वसंतराव धाडवे,नगरसेवीका सौ. निकमताई, निकम,सरपंच शरद गोदारा,सौ. सुभद्राआई वाडे, आधार वाडे,सौ. सुरेखाताई वाडे, सौ.प्रमिलाताई खडसे, ऍड सौ. भारती सोमाणी,सौ.वृषाली टेकाळे,मीनाताई उलेमाले,अॅड. सुरेश टेकाळे,राजुभाऊ अवताडे, विठ्ठलराव अवताडे,रविंद्र वाडे, गौतम वाडे,दिपक वाडे,संदिप वाडे,महादेव हरकल,सरकार इंगोले,भन्ते महाकष्यप भंतेजी, उद्योजक रामदास चांदवानी, दिलीप जोशी,मोहित कर्णवट, आशिष हुरकट,अनिल केंडळे, समवेत मान्यवरांची उपस्थिती होती.सर्वप्रथम मान्यवराचे हस्ते दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.सर्व मान्यवरांचा संविधान व शाल देवून सत्कार करण्यात आला.

यावेळी आयोजक संजय वाडे यांनी प्रास्ताविकातून आपल्याला मुलगी व बहिण नाही. त्यामुळे आपल्या हातून कन्यादान व्हावे अशी स्वेच्छा होती .पुढे एका प्रसंगातून सर्वधर्मिय सामुहिक विवाह सोहळयाची संकल्पना डोक्यात आली. व ती प्रत्यक्षात उतरविण्याकरीता त्यांचा संपूर्ण परिवार व समितीचे पदाधिकारी यांनी अहोरात्र परिश्रम घेतल्याने त्यांनी हा सोहळा यशस्वी करून कन्यादानाचे पुण्य पदरी पाडून घेतले आहे. कन्यादानाचेवेळी मनोगत व्यक्त करतांना संजय वाडे यांच्या भावना अनावर होवून त्यांच्या डोळयात आनंदाश्रू तरळले. "आपण सदैव सामाजिक बांधीलकीतूनच अशा प्रकारचे विविध उपक्रम राबविणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला."यावेळी खा. भावना गवळी व संजय वाडे यांच्याहस्ते सामाजिक कार्यकर्ते निलेश सोमाणी यांच्या वाढदिवसानिमीत्त उपस्थितांन संविधान भेट देवून सत्कार करण्यात आला. सोबतच राहुल भगत,सचिन मांढरे,विनोद खजुरे, राजुभाऊ अवताडे ,संतोष शिंदे,यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.प्रा. दयाराम गव्हाणे यांच्या कुश पुस्तकाचे विमोचन करण्यात आले.माजी मंत्री ठाकरे,आ. राजेंद्र पाटणी, आ.ऍड.किरणराव सरनाईक, प्रो. जोगेन्द्र कवाडे सर, माजी आ. विजयराव जाधव यांनी आपल्या विचारातून संजय आधारवाडे व सर्व कार्यकर्त्याचे अभिनंदन केले. आज हा नवा इतिहास रचला गेला असून खर्या अर्थाने या उपक्रमाची समाजाला गरज आहे.कर्जबाजारी व अन्य कारणाने आत्महत्याचे प्रमाण वाढत असून काळाची गरज ओळखून संजय वाडे व त्यांच्या चमूने अतिशय नियोजनबध्द कार्यक्रमाची आखणी करून हा सोहळा यशस्वी करून दाखविला. या प्रसंगाची इतिहासात नोंद झाली असून निश्चितच त्याचा सर्व कन्येचा आशिर्वाद संजय वाडे व सर्व टिमला मिळणार असल्याचे सांगितले. खा. गवळी यांनी या उपक्रमामागची भूमिका विषद करून संजय वाडे व त्यांच्या टिमसोबत या आयोजनामध्ये सक्रिय सहभाग नोंदविला. पुढील वर्षी वाशीमला यापेक्षा मोठा सर्वधर्मिय सामुहिक विवाह सोहळयाचे आयेाजन करणार असल्याची घोषणा केली. यावेळी सर्व वरवधुंना संविधान व साहित्याचे वितरण करण्यात आले. प्रत्येक धर्माच्या रितीरिवाजाप्रमाणे विवाह लावण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन अजिम राही आणि समाजसेवी निलेश सोमाणी यांनी तर आभार देवेंद्र पाटील खडसे, व सावके सर यांनी मानले. कार्यक्रमाला साठ हजाराच्या संख्येत जनसमुदाय उपस्थित होता. इतिहासाच्या या अभूतपूर्व सोहळयाचे साक्षीदार होण्याची भाग्य मिळाल्याच्या आनंद प्रत्येक जण व्यक्त करीत होता.कार्यक्रम यशवितेसाठी वाडे परिवार, सर्वधर्मीय विवाह समिती पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले. या विवाह सोहळ्याच्या वृत्तसंकलनाकरीता महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष आणि साप्ताहिक करंजमहात्म्य परिवाराचे प्रमुख संजय कडोळे, डॉ.ज्ञानेश्वर गरड, समाजसेवी प्रदिप वानखडे उपस्थित होते. विवाह सोहळ्याचे सरचिटणिस निलेश सोमाणी यांनी व्यासपिठावर बोलवून त्यांचे स्वागत केले. तर संजय कडोळे, डॉ. ज्ञानेश्वर गरड, प्रदिप वानखडे यांनी निलेश सोमाणी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
आपल्या प्रतिक्रिया द्या....