ब्रम्हपुरी:-राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने समाजात विविध उपक्रमाच्या माध्यमातून राबविले जाणारे स्वच्छता अभियान, जनजागृती कार्यक्रम हे खरं तर एक प्रकारे देशाची अप्रत्यक्ष सेवा आहे. जे देशाच्या सिमेवर सैनिक सेवा करतात ती प्रत्यक्षातील सेवा आहे. परंतु ही सुध्दा एक समाजातील विविध समस्या असतील त्याविषयी समाजजागृती करणे ही पण समाजसेवा या घटकात समाविष्ट होते. तेव्हा युवकांनी समाजातील विधायक कार्यासाठी स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन रक्तदान असे कार्यक्रम राबविले पाहिजेत ती एक प्रकारची समाजातील सेवा असली तरी देशाची सेवा आहे हे आपण विद्यार्थ्यांनी समजून घेण्याची गरज आहे. असे अरविंद खोकले यांनी विचार मांडले. राष्ट्रनिर्मितीत युवकांची भूमिका या विषयावर नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालय ब्रम्हपुरी येथिल राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित राष्ट्रीय सेवा योजना दिनानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून विचार व्यक्त केले.
यावेळी विचारपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ डी एच गहाणे सर, विशेष उपस्थित मेजर विनोद नरड, लायन्स रामकुमार झाडे, शंकर केळझरकर, श्री मोहरकर साहेब, श्री मानापुरे, डॉ सुभाष शेकोकार, डॉ हर्षा कानफाडे प्राचार्य, डॉ प्रकाश वट्टी, डॉ विवेक नागभिडकर व प्रा अभिमन्यू पवार, गोपाल करंबे, सुरज के. मेश्राम अनिकेत उराडे इ. मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी डॉ डी एच गहाणे यांनी रासेयो स्वयंसेवक यांनी रचनात्मक कार्यासाठी स्वयंस्फूर्तीने पुढे यावे व महाविद्यालयाचे नाव समाजसेवेसोबत जोडावे कारण आपल्या महाविद्यालयास एक उत्तम राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांचा वारसा लाभला तो वारसा कर्मयोगी मदनगोपालजी भैया ते हिरालाल भैय्या आणि मग किसनलालजी भैया असा जोपासला आहे. त्यामुळे महाविद्यालयानी ही परंपरा जोपासली आहे. ही कायम राहिली पाहिजे. ते आपणाकडून अपेक्षा आहे. असे मौलिक विचार व्यक्त केले. सोबतच सर्व मान्यवर यांनी विचार मांडले. यावेळी मयूर भागडकर या रासेयो स्वयंसेवकाचे अग्नीवीर झाल्याबद्दल अभिनंदन केले. तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ विवेक नागभिडकर यांनी केले आणि सुत्रसंचलन कु सुषमा ठूसे हीने तर आभार शितल भाजीपाले यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गोपाल करंबे, सुरज मेश्राम, अनिकेत उराडे, मयूर भागडकर, प्रांजली प्रधान, मयुरी ठेंगरी, निलिमा ढोरे, प्रमोद ढोरे, विक्रम मानकर, विवेक वैरागडे, शिवानी नागोसे, सागर पारधी, वैष्णवी राऊत, सुनील राऊत, रिद्धी, पूनम यांनी अथक परिश्रम घेतले.