आरोपी अशोक बाबुराव शेंद्रे वय:- ३० वर्ष राह:- पातळी (गणेशपुर) तालुका:- ब्रम्हपुरी याने आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत दिनांक २ ऑगस्ट रोजी काठीने पायावर,हातावर,पाठीवर,डोक्यावर जबर मारहाण करून खून केला .
त्यामुळे आरोपीविरुद्ध ३६५/२०२३ नुसार भांदवी कलम ३०२ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला.
आरोपीला ४ ऑगस्ट रोजी न्यायालायात हजर केले असता १ दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिल कुमरे करीत आहे.