वाशिम : जिल्हा परिषदेच्या विविध संवर्गातील गट-क संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्यासाठी 21 ते 23 ऑक्टोबर 2023 या कालावधीत कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) बांधकाम/ग्रामीण पाणी पुरवठा व औषध निर्माण अधिकारी या पदाची नियोजित परीक्षा काही अपरिहार्य कारणामुळे आयबीपीएस कंपनीकडून पुढे ढकलण्यात आली आहे. परीक्षेचे पुढील वेळापत्रक परीक्षार्थींना www.zpwashim.in या संकेतस्थळावर कळविण्यात येईल. असे सदस्य सचिव, जिल्हा निवड समिती तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कळविले आहे.