अकोला, :-- दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री संताजी इंग्लीश माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत 100% निकालाची परंपरा कायम राखली आहे.
शाळेतील आंनदी लवकुमार कांगणे हिने 92.80% गुण मिळवून शाळेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्यानंतर भक्ती रवींद्र निवाने 82.80%, प्राची राजेंद्र कदम 81.80%, आचल रणजित चोपडे 78.80%, रोहित रामभाऊ लेखणार 79.60%, अंजली संतोष अवातीरक 78.40%, वैष्णवी गजानन ताथोड 76.00%. या सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनीनी उल्लेखनीय कामगिरी करत शाळेच्या गुणवत्तेची पातळी उंचावली आहे. या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष मा. श्री मंगेशजी श्रीधरराव वानखडे, शाळेचे प्रभारी श्री. विठ्ठल नांदूरकर सर , ज्योतीताई फंदाट, अश्विनी राजे, माधवी कुलकर्णी, पूजा भाकरे, अपर्णा देशमुख, सांगळे सर, वाडेकर सर तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. अश्विनी खोत मॅडम. तसेच शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
अभ्यासाची सातत्यपूर्ण शिस्त, शिक्षकांचे मार्गदर्शन व शाळेतील आधुनिक शिक्षण पद्धती यामुळे विद्यार्थांनी हे घवघवीत यश मिळवले असल्याचे शाळेच्या वतीने सांगण्यात आले.