पुरोगामी महाराष्ट्रा मध्ये मुर्दाळ जातीवादी शक्तीची भारतरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षण आणि बुद्धीच्या जोरावर महाराष्ट्र सह देशात आंबेडकर विचार आणि चळवळ उभी केली.छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शाहू महाराज .महात्मा ज्योतिबा फुले .डॉ बाबासाहेब आंबेडकर .यांच्या पुरोगामी महाराष्ट्रात राजकीय वारसा असणाऱ्यांनी आपल्या राजकीय स्वार्थासाठी अनेक प्रकारे पक्ष आणि आघाड्या स्थापन करून शिव शाहू फुले डॉ आंबेडकर यांचे विचार आणि आंबेडकरवादी चळवळ संपण्याचा प्रयत्न करणाऱ्या नेत्यांचा आगामी काळात बहुजन जनता दलाशी थेट सामना असणार असल्याचे मत बहुजन जनता दल संस्थापक अध्यक्ष पंडित भाऊ दाभाडे यांनी व्यक्त केले
बहुजन जनता दलाच्या वतीने राज्यस्तरीय राबवण्यात येत असलेल्या हर घर बहुजन जनता दल अभियानांतर्गत औरंगाबाद पैठण रोडवरील गोरा कुंभार सभागृहाच्या मैदानावर बहुजन जनता दल औरंगाबाद जिल्हा शाखेच्या वतीने बहुजन जनता दल औरंगाबाद जिल्हा शाखेचे अध्यक्ष शांताराम गावंडे पाटील यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शन म्हणून उपस्थितीत जनसमुदायाला संबोधित करताना बहुजन जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पंडित भाऊ दाभाडे हे बोलत होते
पंडित भाऊ दाभाडे पुढे म्हणाले की राजकीय वारसा असणाऱ्यांनी अनेक प्रकारे पक्ष व आघाड्या स्थापन करून शिवसेना-भाजप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि काँग्रेस पक्ष व इतरही राजकीय पक्षांच्या दावणीला पक्ष व आघाड्या बांधून ठेवले आहेत त्यामुळे दल बदलू आणि विश्वासघातकी नेत्यांच्या मांगे आंबेडकरवादी सामान्य नागरिक आता जाणार नाही आणि त्यांच्या भुलथापांना बळी सुद्धा पडणार नाही असेही बहुजन जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पंडित भाऊ दाभाडे यांनी म्हटले आहे.
कार्यक्रमाचे आयोजन बहुजन जनता दल औरंगाबाद जिल्हा शाखेचे जिल्हा अध्यक्ष शांताराम गावंडे पाटील यांनी केले होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बहुजन जनता दल नगरसेविका प्रमोदिनी डावखरे .माजी नगरसेवक रामदास डोरले. माजी नगरसेवक केशव गंगणे मराठवाडा विभागीय अध्यक्ष डॉ अमोल केळकर. औरंगाबाद शहर अध्यक्ष फैजल सय्यद. पैठण शहर अध्यक्ष संभाजी शेलार अजंठा लेणी शहर अध्यक्ष सतीश राजवाडे गंगापूर शहराध्यक्ष जीवन कांबळे वळूज शहराध्यक्ष महेश भालेराव यांच्यासह आदी मान्यवर उपस्थितीत होते.
कार्यक्रमाचे संचालन आबाराव मुसळे यांनी केले तर आभार प्रदर्शन बहुजन जनता दल औरंगाबाद जिल्हा शाखेचे जिल्हाध्यक्ष शांताराम गावंडे पाटील यांनी केले यावेळी जोखान सय्यद बंडू जाधव शिवाजी थोरात अक्षय मांगले दिपक कांबळे विशाल माने किशोर राऊत सुनील पाटील आनंद गजभिये महेंद्र इंगळे धनराज पाटील प्रा भाऊसाहेब शिंदे दादासाहेब तरडे छबुताई तायडे मिना खांडेकर सुनिता राऊत ज्योति जाधव पुष्पा भावे कमला शिवधने यांच्यासह बहुजन जनता दल महिला आघाडी युवा आघाडी वैद्यकीय कामगार आघाडी आणि बहुजन जनता दलाचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थितीत होते असे बहुजन जनता दलाचे औरंगाबाद जिल्हा शाखेचे जिल्हा अध्यक्ष शांताराम गावंडे पाटील यांनी कळविले आहे