राज्यातील ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर महाराष्ट्र सरकारला सर्वोच्च न्यायालयाकडून दोन आठवड्यात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर करा असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र राज्य सरकारला दिले आहेत कोर्टाच्या या निर्णयामुळे आता ओबीसी आरक्षणाशिवाय राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका लवकरच जाहीर होणार आहेत, या अनुषंगाने बहुजन जनता दलाच्या राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक पुणे येथील बहुजन जनता दलाच्या पक्ष कार्यालयात बहुजन जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पंडीत भाऊ दाभाडे यांच्या नेतृत्वाखाली नुकतीच बैठक संपन्न झाली,
नुकत्याच संपन्न झालेल्या पुणे येथील बहुजन जनता दलाच्या राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांच्या महत्त्वपूर्ण बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संदर्भातील विविध विषयावर चर्चा करण्यात आली राज्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये बहुजन जनता दल समविचारी पक्ष सोबत युती करून किंवा स्वबळावर निवडणुका लढणार असा महत्त्वपूर्ण निर्णय झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे असे बहुजन जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पंडित भाऊ दाभाडे यांनी सांगितले आहे,
आगामी निवडणुकांमध्ये बहुजन जनता दलाच्या वतीने महिलांना 50 टक्के उमेदवारी आणि युवकांना मोठ्या प्रमाणात संधी देण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला असून मुंबई ठाणे पुणे नाशिक औरंगाबाद नागपुर अमरावती अकोला यांच्यासह राज्यातील महानगरपालिका (20 )नगरपालिका (2000)आणि जिल्हा परिषदा (280 )या सर्व ठिकाणच्या जागेवर बहुजन जनता दल आपले उमेदवार उभे करून स्वबळावर निवडणुका लढणार आहे असेही पंडित भाऊ दाभाडे यांनी म्हटले आहे,
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संदर्भात बहुजन जनता दलाच्या राज्यातील जिल्हा शहर व तालुका स्तरीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांची सविस्तर चर्चा करण्यासाठी व निवडणुका संदर्भात विचार व नियम करण्यासाठी बहुजन जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पंडित भाऊ दाभाडे हे दिनांक मंगळवार 10/5/2022 ते शुक्रवार दिनांक 20/5/2022, प्रयन्त राज्याचा दौरा बहुजन जनता दलाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते सह करणार असल्याचे निश्चित निर्णय घेण्यात आला आहे या राज्यस्तरीय दौऱ्यामध्ये बहुजन जनता दलाच्या शहर तालुका व जिल्हास्तरीय कार्यकर्त्यांच्या व पदाधिकार्यांच्या गाठीभेटी घेऊन जिल्हा व तालुका या ठिकाणी कार्यकर्ता मेळावा चर्चासत्र बैठकांचे आयोजन यासंदर्भात चर्चा करण्यात येणार असून सामान्य जनतेमध्ये बहुजन जनता दलाचे ध्येय धोरण यांचा प्रसार व प्रचार करण्यासाठी पंडित भाऊ दाभाडे कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत राज्यस्तरीय दौऱ्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र कोकण विदर्भ आणि मराठवाडा या विभागांमध्ये दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे या वेळी माजी नगरसेवक रामदास डोरले माजी नगरसेवक केशव गंगणे, संदेश कांबळे शांताराम नांदगावकर राजेंद्र पाटील किशोर गावंडे महेंद्र बरकडे प्रतिक दाभाडे दिपक निगडे सुभाष सुरवाडे जीवन गवई दीपक पाटील किशोर कदम विनायक वाडकर सुरेश नाईक केदार जाधव विजय शिंदे मयुर पाटील यांच्या सह अनेक बहुजन जनता दलाचे राज्यस्तरीय पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते