तालुक्यातील रामपुर मधील गुराख्याने गायी चारायला जंगलात गुरे नेले असता वाघाने गुरख्याचा पाठलाग केला पण "देव तारी त्याला कोण मारी" हि मन अखेर सार्थक ठरली.! गुरख्याचा चपळतेने गुराखी झाडावर चढला आणि वाघाने गायिवर डल्ला मारला. केवळराम ठेंगरी यांच्या गायीचा घोट घेतल्याची ताजी तवाणी घडामोड असतांना आज शुक्रवारी सकाळी गवतासाठी व्यंकट माकडे रामपुर हे स्वतःच्या शेतात गेले असता वाघ दबा धरून बसलेला होता.गवत कापून झाल्यानंतर उभे झाल्यावर 20 फुटावर वाघ जमीनीवरून चोर पावलांनी समोर येतांना दिसताच व्यकट माकडे हे सतर्क झाले आणि मागे सरकत काडी हातात घेऊन सडकेवर पळत आले आणि शेताजवळ असलेल्या शेतकऱ्यांना जवळ बोलवून वाघाला पळवून लावले.
सालमारा येथील या एक महिण्याअगोदर वाघाचा पहिला बळी झालेला आहे आणि शुक्रवारी वाघाचा दुसरा बळी झाला असता.