वीट उत्पादकांना वीट चे हंगाम सुरू असताना वीट भट्टी बंद करण्याचा आदेश प्रशासन दिलाय अन्यायकारक असून शेतकरी वीट उत्पादक तसेच कामगार व घर निर्माण करणाऱ्या नागरिकांना अडचण निर्माण होणार आहे आज वीट उत्पादक शेतकऱ्यांनी रणधीर भाऊ सावरकर यांची भेट घेऊन आपली अडचणी व प्रशासनाची अडवणूक याविषयी माहिती देऊन सर्व नियमांचे पालन करत असताना त्रासाबद्दल निवेदन देऊन गार्हाणी मांडली.
आज अकोट बाळापुर चोहटा निंबा परिसरातील शेतकऱ्यांनी जिल्हा भाजपा अध्यक्ष रणधीर सावरकर यांची भेट घेऊन खारपाणपट्ट्यातील शेतकऱ्यांच्या याभागात वीट उद्योग शिवाय कोणताही उद्योग नाही सर्व शेती कोरडवाहू आहे गोड पाण्याचे स्तोत्र नाही तो ओलीत शेती नसल्यामुळे फळबाग नाही 20 टक्के माती राख तसेच उसाचे चिपाड, तर टिकाऊ वस्तू टाकून तयार करतात 30 हजार पेक्षा जास्त कामगार यामध्ये काम करत असून अनेक परिवारांचा पालन-पोषण या धंद्यामुळे होतो हंगामी धंदा असल्यामुळे जोडधदा म्हणून शेतकरी काम करतो जाचक ची अटी अटी व पर्यावरण न्याय द्यावा अशी मागणी आमदार सावरकर यांनी केली