कारंजा (लाड) : भविष्यात कारंजा मानोरा विधासभा मतदार संघाचा विकास करायचा झाल्यास आणि महायुती तसेच महत्वाचे म्हणजे भाजपा पक्षाला विजय हवा असल्यास सध्या तरी मतदारांकडून,भाजपाचा सर्वगुण संपन्न अभ्यासू योद्धा म्हणून केवळ आणि केवळ ॲड.ज्ञायक राजेंद्र पाटणी यांचेकडे पाहिले जात आहे.ॲड ज्ञायक राजेंद्र पाटणी यांची मुर्ती लहान असली तरी किर्ती महान आहे.त्यांनी वडिल स्व.राजेंद्र पाटणी यांच्या निधनाचे दुःख दूर सारून लगेचच स्वतःला मतदार संघाच्या विकासाकरीता वाहून घेतलेले आहे.एवढ्या कमी वयात त्यांनी गेल्या वर्षभरात मतदार संघातील प्रत्येक गावखेडे,मोहल्ले,वस्त्या वार्ड न् वार्ड फिरून,मतदाराच्या भेटी गाठी घेऊन,यशस्वी नियोजन करीत,जो कामाचा धुमधडाका सुरू केला.त्याबद्दल निश्चितच त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप द्यायला हवी आहे.जो तरुण मतदार संघासाठी आज एवढी धावपळ करीत आहे. त्या तरुणाला आमदार होण्याची संधी दिल्यास त्या संधीचे सोने ही व्यक्ती करणार आहे.ॲड.ज्ञायक पाटणी यांनी कारंजा मानोरा मतदार संघाची कर्मभूमी म्हणून निवड केलेली आहे.शिवाय सासरवाडीच कारंजा असल्यामुळे ह्या मतदार संघाशी त्यांची नाळ घट्ट जुळली आहे.त्यांचे वय लहान आहे.ज्या वयाला आपण खेळण्या बागडण्याचे वय म्हणतो. त्या तरुण वयात हा अभिमन्यू राजकारणाच्या चक्रव्यूहाचा भेद करण्यासाठी रणांगणात उतरतो आहे.विशेष म्हणजे त्यासाठी राजकारणाचे डावपेच शिकविणारे बाळकडू देखील त्यांना त्यांच्या वडिलाकडून स्व. राजेंद्रजी पाटणी यांचे कडूनच मिळाले आहे.आणि त्यांनी त्यांच्या वडीलांच्या स्व. राजेंद्र पाटणी यांनी यशस्वी रणनीती आखून लढविलेल्या मागील निवडणूकीचे अनुकरण करीत जर आगामी 2024 ची विधानसभा निवडणूक लढवीली.तर निश्चितच त्यात ते यशस्वी होणारच आहेत. निवडणूक रणांगणात त्यांच्या समोर दिग्गज नेते राहतील. मतदारांना भुलविण्याकरीता वेगवेगळे आमिषही दिल्या जातील.मात्र तरीही अल्पावधीतच मतदारांच्या विश्वासाला सार्थ ठरवून त्यांची सहानुभूती संपादक करण्यात यशस्वी ठरलेले,ॲड.ज्ञायक पाटणी सर्वच दिग्गजांना धूळ चारीत स्वतःचा विजय संपादन करतील.ही आजची वस्तुस्थिति आहे.त्याकरीता दररोज त्यांना मानोरा व कारंजा तालुक्याच्या ग्रामीण व शहरी भागातून मतदारांचा वाढता पाठींबा मिळत आहे.भाजपा पक्ष आणि स्व.राजेंद्र पाटणी यांना मानणारा फार मोठा जनसमुदाय त्यांच्या सोबत खंबीरपणे उभा आहे.असे वृत्त मतदार संघातील मतदारा कडून आढावा घेतल्यानंतर ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे यांनी दिले आहे.