ब्रम्हपुरी. : - शेतावरून घरी परत येत असताना दबा धरून बसलेल्या वाघाने शेतकऱ्यावर हल्ला केला त्या हल्ल्यात ब्रम्हपुरी तालुक्यातील कुडेसावली येथील शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची सोमवारी घटना घडली.
घनश्याम गोविंदा उंदीरवाडे( ५२) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
प्राप्त माहिती नुसार सकाळी ८ ते ९ वाजताच्या सुमारास शेतकरी घनश्याम उंदीरवाडे हे शेतावर गेले होते. शेतातील काम आटोपून घराकडे परत येत असताना झुडपात दबा धरून असलेल्या वाघाने अचानक शेतकऱ्यांवर हल्ला केला.हल्ल्यात त्याचे मुंडके धडापासून वेगळे झाले होते. वनविभागाला माहिती मिळताच अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केले घटनेची तक्रार ब्रम्हपुरी पोलिस स्टेशन येथे नोंदविण्यात आली.मृतकाला शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले होते.
आज मृतकाच्या परिवारास वनविभागाच्या वतीने २५ हजाराची तात्पुरती मदत देण्यात आली.यावेळेस भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉ.विनोद झोडगे पाटिल ,आर एफ ओ आकाश सोंडवले यासह आदी उपस्थित होते.