अकोला; स्थानिक जिल्हाधिकारी व निवडणूक निर्णय अधिकारी जिल्हा अकोला तर्फे डॉ.विशाल कोरडे यांना मतदार साक्षरता अभियान जिल्हा अकोला चे ब्रँड अँबेसिडर म्हणून घोषित केले असून डॉ.कोरडे दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला च्या माध्यमाने संपूर्ण जिल्ह्यात मतदार साक्षरता अभियान विविध पद्धतीने राबवित आहेत . दि.12 एप्रिल २०२४ रोजी बार्शीटाकळी येथील जी.एन. ए महाविद्यालय येथे डॉ.विशाल कोरडे यांचा मतदार साक्षरता अभियान कार्यक्रम नवमतदारांच्या उपस्थितीत पार पडला*. *पहिल्यांदाच मतदान करणारे महाविद्यालयातील विद्यार्थी- विद्यार्थिनींशी डॉ.विशाल कोरडे यांनी संवाद साधून त्यांना मतदानाचे महत्त्व स्पष्ट केले. एवढेच नव्हे तर दिव्यांग प्रा.नागेश उपरवट याला ब्रेल लिपीच्या साह्याने मतदान कसे करायचे ? याविषयी प्रशिक्षण दिले. यावेळी नव मतदारांनी दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला चे सदस्यत्व स्वीकारून 26 एप्रिल २०२४ रोजी मतदान केंद्रावर ग्रामीण विभागातील दिव्यांग मतदारांना व ज्येष्ठ नागरिकांना मतदान करण्यासाठी घेऊन जाण्याची शपथ घेतली* . मतदार साक्षरता अभियानाच्या जनजागृतीपर कार्यक्रमात महाविद्यालयाच्या सर्व विद्यार्थी , शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी संगीत विभागाच्या माध्यमाने सहभाग नोंदवला . *चला उठा जागृत होऊन करूया मतदान ह्या डॉ.कोरडे लिखित मतदार साक्षरता गीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला . मतदान जनजागृती कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्राचार्य डॉ.तारेश आगाशे , डॉ.सुनील कोल्हे , डॉ.संतोष खंडारे , डॉ.राजू सरकटे , डॉ.मनोजकुमार देशपांडे , डॉ.प्रीती इंगळे दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला चे सदस्य सिद्धार्थ ओवे , अस्मिता मिश्रा , अनामिका देशपांडे , श्रीकांत कोरडे, गणेश सोळंके व विजय कोरडे यांनी सहकार्य केले .