कारंजा : भाविकांना कळविण्यात आनंद होतो की,आज गुरु प्रतिपदा गुरुवार दि.१३ फेब्रुवारी २०२५ रोजी दिवसभर श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचा आनंदोत्सव असून १२:३० ते o ०४:०० पर्यंत श्री गुरुमंदिरमध्ये महाप्रसाद आहे.रात्री शैल्यगमण यात्रेनिमित्त, रात्री ०८:०० ते दुसरे दिवशी सकाळी ०७:०० पर्यंत नगरपरिक्रमा पालखी महायात्रा निघणार आहे.तरी समस्त दत्तउपासक कारंजेकरांनी,वारकरी भजनी मंडळींनी या आनंदोत्सव सुवर्णसंधी अमृत योगाचा लाभ अवश्य घ्यावा.ही विनंती आहे. असे आवाहन विनम्र जय भवानी जय मल्हार वारकरी मंडळ कारंजा.तथा अध्यक्ष विदर्भ लोककलावंत संघटना कारंजाचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी केले आहे.