सामान्य पातळीवर येऊन,ज्याला वेदना जाणता येतात.त्याला संवेदनाशील व्यक्ती समजले जाते.दुःखाची वेदना ज्याला जाणवते,तो संवेदनाशील असतो.जो सर्वांना समजून घेतो तो माणूसअसतो.आणि सर्वांच्या कल्याणासाठी जो झटतो.व प्रसंगी लढण्यासाठी तयार होतो,त्याला मानवतावादी असे म्हटले जाते.दुसऱ्यांचं मन जाणायला भावना लागतात.तेव्हा मग माणसं पारखून,निरखून त्यांच्यासाठी योजना तयार करता येतात.असच एक शिक्षकांच्या हकाचं व कर्तव्य आणि स्वप्नपूर्तीचे विशाल नाव आहेत शिक्षक आमदार किरणराव सरनाईक.
2020 च्या अमरावती शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत एक नवा विक्रम स्थापित करीत त्यांनी,वाशिम जिल्ह्याला पाच जिल्ह्याचे नेतृत्व बहाल केले.केवळ 3000 शिक्षक मतदार असलेल्या जिल्ह्याला विभागातील पाच जिल्ह्यांचे नेतृत्व करण्याची संधी प्राप्त झाली.ती केवळ भाऊसाहेब आमदार किरणराव सरनाईक यांच्यामुळे.शिक्षण आणि शिक्षकांच्या आजच्या वास्तविक समस्या विदारक आहेत.त्या कोणीही आजपर्यंत समजूनच घेतल्या नाहीत.त्या समस्यांच्या मुळाशी जाऊन भाऊसाहेब किरणरावांनी त्याचा अभ्यास केला.शिक्षणाचा हक्क गरिबापर्यंत पोहोचवायला सरकारी यंत्रणा आजही असमर्थ ठरतआहेत.त्यामुळे शिक्षणाचा हक्क आजही गरिबां पर्यन्त पोहोचतच नाही.सरकारी मराठी शाळा बंद करण्याचा प्रयास आजही केला जातो.तसेच वातावरण आजही आपल्या आजूबाजूला आहेच.त्यातून मग आजही विनाअनुदानित,कायमअनुदानित शाळांचा प्रश्न कायमचआहे ? हे सारे प्रश्न किरणराव भाऊंनी सरकार दरबारी मांडून त्यावर उपाययोजना सांगितल्याआहेत.आणि त्यातून एक विभागीय शिक्षक संघटना तयार केली आणि त्याद्वारे त्यांनी ज्ञानवंतांच्या विवंचना समजून घेतल्या आहेत.मतदार संघात जाऊन समस्या जाणून घेऊन,लढण्याची एक नवी शक्ती त्यांनी शिक्षकांमध्ये तयार केली आहे.
2020 चे निवडणूकित ते निवडून भरघोष मतांनी निवडून आलेत.निवडणुकीनंतर अगदी काहीच महिन्यात त्यांनी 20 टक्के अनुदानाचा प्रश्न मार्गी लावला आणि त्याहीपुढे दुसरा टप्पा 40%अनुदानाचा देण्यासाठी सरकारला बाध्य केले आहे.
मराठी शाळा बंद झाल्या तर मराठी माणसांचे काय होईल ? हा प्रश्न कित्येकदा त्यांनी सरकारकडे मांडला आहे.मराठी शाळांची कमी होणारी पटसंख्या, शासनाने इंग्लिश शाळेची वाटलेली खिरापत,यातून शिक्षकांच्या अस्तित्वाचा प्रश्न तयार झाला आहे.भाऊसाहेब किरणराव यांनी यावर प्रचंड विचार मंथन करून शिक्षकांना याविषयी अवगत केले आहेच आणि ते सर्व प्रश्न त्यांनी सरकार दरबारी आज लावून धरले आहेत.त्यांच्या पाठपुराव्यांनीच संच मान्यता आणि शाळांच्या 40% अनुदानाचा प्रश्न आज मार्गी लागला आहे.शिक्षक आणि शिक्षणाविषयीचे प्रश्न आजच तयार झालेले नसून,मागील 20 वर्षापासून याची सुरुवात झालेली आहे.त्यामुळे स्वहक्काच्या शिक्षणाकरीता मराठी माणसांना दीर्घकाळ पर्यंत लढत द्यावीच लागणार आहे,असे भाऊसाहेब नेहमी सांगतात.शिक्षण हक्कासाठी शिक्षकांची सभा,समेंलंन ते भरवत आहेत.एक सुजाण व विद्वान व्यक्ती म्हणून त्यांचे व्यक्तिमत्व प्रसिद्ध आहे.प्रत्येक घटनेचा बारकाईने अभ्यास करून ते विचार मांडतात व शिक्षकांचे प्रश्न सरकारी दरबारी लावून धरत आहेत. शिक्षकांनी त्यांच्या हक्कासाठी,न्यायासाठी त्यांना निवडून दिले आहे याची जाणीव ठेवून त्यांनी शिक्षण क्षेत्राचे अनेक प्रश्न आज सरकारपुढे मांडले आहेत.मराठी शाळेची कमी होणारी विद्यार्थी संख्या,शिक्षण क्षेत्रातली दप्तर दिरंगाई,मराठी शाळांचे खाजगीकरण या विषयीची परखड अशी मते सरकारपुढे मांडलेली आहेत.सरकार दरबारची दप्तर दिरंगाई व भ्रष्ट्राचार यावरही त्यांनी सरकारला अवगत केले आहेच.
.सारेच दीप कैसे मंदावलेआता,अशा निराशेच्या गर्तेत गेलेल्या ज्ञानवंत शिक्षकांच्या विंवचना सरकारपुढे मांडून,त्यांना लढण्यासाठी त्यांनी प्रवृत केलेआहे.शिक्षकांना त्यांनी ज्ञानवंत मानून तुम्ही शिकवण्याचे पवित्र काम करून
देशसेवा करीतआहात.तुमच्यासाठी मी खंबीरपणे उभाचआहे,ही खंबीर भूमिका घेऊन त्यांना लढवय्या बनविलेआहे.शिक्षक आणि शिक्षण त्यांच्या अखंड चिंतनाचा विषय असून या क्षेत्राला त्यांनी जीवदान दिले आहे.भाऊसाहेब यांचा हा लढा त्यांनी केलेल्या अखंड चिंतनाचे व हजारो शिक्षकांसाठी दिलेल्या लढाईने आज यशस्वी झाला आहे.सारेच यश एक वेळ प्राप्त होत नसते,त्यांनी आता मराठी शाळा वाचण्यासाठीचा लढा सुरू केला आहे.शिक्षण ही जीवनाची संजीवनीआहे.ही ज्ञानगंगा आटली तर बहुजन समाज निराशेच्या खाईत जाईल.त्यांचा विकासाचा प्रवाह अवरोधित होईल.म्हणून त्यांनी हे सुरू केलेले कार्य अप्रतिम असेच आहे.सत्ता,संपत्तीसाठी मागे धावणारे इतर राजकारणी आणि समस्या मुक्तीसाठी आणि वंचितांच्या शिक्षणासाठी चाललेला हा अखंड असा ज्ञानयज्ञ किरणराव सरनाईक यांनी सुरू केला आहे.हा लढा लोकशाही मार्गाने लढूनच न्याय मिळवून देण्याचा त्यांचा मानस आहे.ज्ञानाने सामर्थ्यशाली बनलेली बहुजनांची पिढी आज हक्क,न्याय मागण्यासाठी सामर्थ्य झालीअसताना,सार्वत्रिक शिक्षणच जर ढासळले असेल तर बहुजनसमाज अज्ञानाच्या गर्तेत जाईल.त्यासाठी आताच कुठे उजाडले असताना हा लढा प्रखर होण्यासाठी आणि ज्ञानवंत शिक्षकांचे आणि ज्ञानाच्या प्रतीक्षेतअसलेल्या बहुजन समाजाचे,ध्येय साध्य करण्यासाठी त्यांचा लढा आज सुरू झाला आहे.ज्या शिक्षणासाठी महापुरुष,महात्मा फुले ,पंजाबराव देशमुख,कर्मवीर भाऊराव पाटील,संत गाडगेबाबा यांनी आपले जीवन समर्पित केले,त्याचसाठी आज किरणराव सरनाईक यांनी शिक्षणाचे आणि शिक्षकांचे हक्क शासनाच्या दारी मांडले आहेत.त्यासाठी संघटनेच्या व शिक्षकांच्या माध्यमातून त्यांनी आज संघर्ष सुरू केला आहे.भाऊ साहेबांचे ज्ञान व कर्तृत्व विशाल व उत्कृष्ठ आहे.शिक्षणासाठीचे प्रश्न मांडताना कोणावरही जहरी टीका न करता लोकशाहीच्या मार्गाने आजही जिंकता येते.आपली मते लादून नाही तर लोकांच्या मनात ठसवून व इतरांचे चांगले मत स्वीकारूनही प्रश्न मांडता येतात व जिंकता येते.त्यांच्या लढाऊ बाण्याने हे सिद्ध झाले आहे.एका लोकशाहीच्या रक्षकाला शोभणारे अप्रतिम असे ज्ञान त्यांनी या निवडणुकीत व जीवनातही सिद्ध केले आहे.सारेच कसे मंदावले आता ... ,यावर शिक्षक निराश झाले असताना,भाऊंनी शिक्षकांना लढवय्या बनवून, भागो नहीं बदलो,असे आवाहन करून परत एकदा लढण्यास,जगण्यास प्रवृत्त केले आहे.ही सारी न्यायाची लढाई लढताना त्यांचा स्वर आज कुठे बिघडत नाही.अगदी शांतपणे ते आपले मत मांडतात.स्वभावातली लवचिकता संयमित स्वर अभ्यासू व्यक्तिमत्व,सुंदर मांडणी ही त्यांची आयुधे आहेत.जिथे श्रद्धा व समर्पण असते तेथे निष्ठा आढळते.हीच निष्ठा प्रामाणिकपणे काम करण्याच्या कार्यातून प्रतीत होते.या ज्ञानमंदिरात हे काम भाऊंनी पार पाडले आहे.ज्ञानवंतांच्या ह्या व्यथा पाहून त्यांचे मन हळहळते.शिक्षक आणि शिक्षणाचे हक्क मांडण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. मराठी माणूस आणि मातृभाषा वाचवण्यासाठी,
गे। मायभू तुझे मी फेडीन पांग सारे।
आणीन आरतीला हे चंद्र सूर्य तारे।।
ही भावना भाऊंच्या ह्रदयात आहे.
14 सप्टेंबर हा त्यांचा वाढदिवस.त्यानिमित्त त्यांना कोटी कोटी शुभेच्छा..! असेच अप्रतिम कार्य भविष्यातही त्यांच्या हातुन शिक्षण क्षेत्रासाठी घडत राहो ही प्रभू चरणी मंगल प्रार्थना. !
प्रा.गजानन बारड
श्री रामराव सरनाईक समाजकार्य महाविद्यालय वाशिम.
आपल्या प्रतिक्रिया द्या....